Jugaad Video : एकही पैसा खर्च न करता वस्तूंचा कसा नव्याने उपयोग करता येईल, यालाच जुगाड म्हणतात. सोशल मीडियावर असे अनेक क्रिएटिव्हीटी दाखवणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये हा तरुण चक्क इस्त्रीवर ऑम्लेट बनवताना दिसत आहे. गॅस नाही म्हणून इस्त्रीवर ऑम्लेट बनवण्याचा हा जुगाड सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या तरुणाने टेबलावर इस्त्री ठेवली आहे आणि इस्त्रीची तळपट्टी वरच्या दिशेने केली आहे. इस्त्री गरम झाल्यानंतर तरुणाने अंडं फोडून इस्त्रीच्या गरम तळपट्टीवर टाकले. इस्त्रीवर ऑम्लेट बनवताना हा तरुण व्हिडीओत दिसत आहे.
अगदी तव्यावर जसं बनवतो, तसे ऑम्लेट त्याने इस्त्रीवर बनवले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही क्षणभरासाठी अवाक् व्हाल. सहसा आपण कपड्यांना इस्त्री करतो पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हा अनोखा जुगाड आवडू शकतो.
हेही वाचा : पाणी पुरी खायला आवडते? हा व्हायरल व्हिडीओ पाहून पाणी पुरी खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल
trendingtodaymagazine या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एका युजरने लिहिलेय, माझ्याकडे इस्त्री नव्हती. त्यामुळे मी तव्याच्या मदतीने कपडे इस्त्री करायची” तर एका युजरने लिहिलेय, “दहा रुपयाचे अंडं आणि पन्नास रुपयांची वीज”