Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ भावूक करणारे असतात तर काही व्हिडीओ पोट धरुन हसवणारे असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण चक्क माकडाची नक्कल करताना दिसतोय. माकडासमोर तरुण माकडाची नक्कल करत असल्याने तु्म्हाला हसू आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

चक्क माकडाची नक्कल करतोय तरुण

हा व्हायरल व्हिडीओ एका सार्वजानिक ठिकाणचा आहे. पाऊस पडत आहे. या ठिकाणी काही माकडं बसलेली दिसत आहे. पावसामुळे ती एका ठिकाणी शांत बसलेली दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुण हाताच्या मदतीने माकडासारखा चार पायावर चालताना दिसत आहे. या तरुणाला असं चालताना पाहून माकडं सुद्धा अवाक् झाले आहेत. तरुणाचे चालणे पाहून तुम्हालाही हसू येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्ही आजवर अनेकदा माकडांना माणसाची नक्कल करताना पाहिले असेल पण या व्हिडीओमध्ये हा तरुण माकडाची नक्कल करताना दिसतोय.

हेही वाचा : VIDEO: गावच्या महिलेचा ‘तौबा तौबा’ गाण्यावर तुफान डान्स; एखाद्या हिरोईनलाही जमणार नाही अशी स्टेप, विकी कौशल म्हणतो…

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : दे दणादण! कॉलेजबाहेर दोन तरुणींमध्ये तुफान राडा; हाणामारी पाहून WWE जाल विसरून; एकमेकींचे कपडे पकडले अन्… पाहा VIDEO

suraj_b_unique या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “इच्छाधारी वानर” तर एका युजरने लिहिलेय, “माकडाला वाटले असेल की आपल्याच प्रजातीचा आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “या तरुणाने भूतांच्या चित्रपटामध्ये काम करायला पाहिजे.” एक युजर लिहितो, “हा पुण्याच्या कात्रज गार्डनमध्ये असायला पाहिजे होता.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी या तरुणाच्या टॅलेंटचे कौतुक केले आहेत. जवळपास तीन लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला असून सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुंबईच्या या तरुणाचे नाव सुरज असून तो सोशल मीडियावर त्याचे अनेक भन्नाट व्हिडीओ शेअर करतो. कधी तो मान वळवतो, तर कधी संपूर्ण शरीर वळवतो. सोशल मीडियावर अनेक युजर्स त्याच्या व्हिडीओवर लाइक्सचा वर्षाव करतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man mimicking of monkey video goes viral on social media ndj
Show comments