Viral Video : आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांचा सण. वारकरी दरवर्षी आषाढी वारीची आतुरतेने वाट पाहत असतात. वारकरी भजन गीत गात आणि विठ्ठलाचे नाव घेत आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरला जातात. महाराष्ट्राच्या विविध गावातून लोक एकत्र येत सामुदायिक पदयात्रा काढतात. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांची पालखी आणि देहू येथून संत तुकाराम यांची पालखी सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी होत पंढरपूरला मार्गस्थ होते. (a young man paints a sketch of a beautiful Vithuraya on the forehead of a pair of bullocks in Dnyaneshwar Maharaj Palkhi sohla video viral)

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात दरवर्षी मानाची बैल जोडी असते. यंदाच्या या बैलजोडीचा व्हिडीओ समोर आला आहे. या बैलजोडीच्या कपाळावर विठूमाऊलीचे चित्र काढताना एक तरुण दिसत आहे. तो अतिशय सुरेख असे चित्र काढताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. हा तरुण विटेवर उभा असलेल्या पांडूरंगाचे चित्र बैलाच्या कपाळावर काढताना दिसत आहे. विशेष म्हणजे तरुणाने चित्र काढण्यासाठी फक्त दोनच रंगाचा वापर केला आहे. एक म्हणजे काळा आणि दुसरा म्हणजे भगवा(केशरी). अतिशय सुरेख असे चित्र हा तरुण काढतो. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : १९५७ मध्ये हरवली होती विद्यार्थीनीची पर्स, चक्क ६३ वर्षानंतर शाळेत सापडली; पाहा VIDEO, काय होते त्या पर्समध्ये?

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : शक्ती आणि युक्तीचा खेळ! प्राण्याची शिकार करण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने धावला चित्ता अन् पुढे जे घडलं… VIDEO पाहून अंगावर येईल काटा

mauli_darshan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२४, मानाची बैल जोडी, भव्य मिरवणूक सोहळा”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “असं वाटत आहे त्या पंढरीच्या माय बापासाठी सगळे एक झाले, चित्रकार आणि त्याची सोबत करणारा पशू मन एक झाले आणि त्यात फक्त पंढरीची ओढ” तर एका युजरने लिहिलेय, “बैल म्हणत असेल जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली” काही युजरने विचारलेय, “चित्र काढणाऱ्या तरुणाचा नंबर मिळेल का?” अनेक युजर्सनी “राम कृष्ण हरी” लिहिलेय.