Viral video: आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्या विषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे.कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या भयानक घडतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, काय लिहावं किंवा काय सांगावं ते सूचत नाही. अशाच एका व्यक्तीने पुलावरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र एक तरुण मागून अक्षरश: देवासारखा धावून आला आणि त्याला वाचवलं. तरुणानं आत्महत्या करणाऱ्याला ज्याप्रकारे वाचवलं हे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

आपल्या जीवाची बाजी लावून कित्येक लोकांना मृत्यूच्या दारातून परत आणणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही एकलं असेल पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायलाही मिळेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती पुलाच्या कड्यावर पाय खाली सोडून उडी मारण्याच्या हेतूनं बसला आहे. आत्महत्या करण्यासाठी हा व्यक्ती त्या ब्रिजवर बसला असून तो कोणत्याही क्षणी खाली पाण्यात उडी मारू शकतो असं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळी एक तरुण त्याला असं करु नको मागे ये असं सांगत आहे मात्र तो व्यक्ती संपूर्ण तयारीनं तिथे बसला असून तो सगळ्यांना त्याच्यापासून लांब राहण्यासाठी सांगत आहे.

दरम्यान याचवेळी एक व्यक्ती एखादी अदृश्य शक्ती यावी अशी बाईकवरुन आली आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभी राहिली. यानंतर त्या व्यक्तीची नजर चुकवून तो बाईकवरुन उतरतो आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तीला मागून जोरात खाली ओढतो आणि त्याचा जीव वाचवतो. मृत्यूच्या तावडीतून तरुणाने आत्महत्या करणाऱ्याला कसं वाचवलं हे तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>“पास तर पास नायतर दोन म्हशी हायत” शाळेत न जाणाऱ्या चिमुकल्याचा हा VIDEO पाहून पोट धरुन हसाल

तिथे उभ्या असलेल्या काही लोकांनी ही घटना आपल्या फोनमध्ये कैद केली. या वेदनादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. stories_hits004 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. या घटनेवर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले… काय कारण असेल की त्या व्यक्तीला आपला जीव द्यावा लागला? दुसऱ्या युजरने लिहिले… ते कशा प्रकारचे लोक आहेत, ते मरण्यापूर्वी आपल्या कुटुंबाचा विचारही करत नाहीत. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले … ही व्यक्ती कर्जदार असू शकते.