Viral Video : पॉपकॉर्न, कोल्ड्रिंक्स यांच्याशिवाय चित्रपट बघण्याचा आनंद अपूर्ण आहे. पण, चित्रपटगृहात मिळणारे पॉपकॉर्न, कोल्ड्रिंक्स यांची किंमत खूपच जास्त असते. त्यामुळे आपल्यातील बरेच जण हे पदार्थ विकत घेणं टाळतात आणि चित्रपटगृहांमध्ये बाहेरील खाद्यपदार्थांवर बंदी असल्यामुळे काही जण वेगळा जुगाड करताना दिसून येतात. आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. चित्रपटगृहांमध्ये बाहेरील खाद्यपदार्थांवर बंदीचा नियम असूनही चित्रपटगृहात चटपटीत खाऊ चोरून नेण्याची एक मजेशीर पद्धत एका तरुणानं दाखवली आहे; जी पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरुवातीला तरुण हॉटेलमध्ये बसून टेबलवर एका बॉक्स उभा करतो आणि त्यात काही चिप्सची पाकिटं, कोल्ड्रिंक व फ्रँकी बॉक्सला चिटकवून ठेवतो. त्यानंतर काळ्या बॅगेत हा बॉक्स ठेवून देतो. त्यानंतर तरुण चित्रपट बघण्यासाठी निघतो. चित्रपटगृहात जाताना सुरक्षेसाठी काही सुरक्षा अधिकारी नेमलेले असतात. ते प्रत्येक व्यक्तीची आणि त्यांनी सोबत आणलेल्या सामानाची तपासणी करतात. चित्रपटगृहात जाण्याआधी या तरुणाचीसुद्धा तपासणी केली जाते. तरुणाची बॅग तपासताना त्यानं लपवलेल्या पदार्थांची भनकसुद्धा अधिकाऱ्यांना लागत नाही आणि तरुण अगदी सहजपणे खाद्यपदार्थ चित्रपटगृहात घेऊन जातो आणि चित्रपट बघताना पदार्थ खाताना दिसतो. तो तरुण कशा प्रकारे पदार्थ लपवून चित्रपटगृहात घेऊन गेला ते एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा… जुगाडू बाप! चिमुकल्याला बाईकवरुन फिरवण्यासाठी शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड, व्हायरल VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल

व्हिडीओ नक्की बघा :

चित्रपटगृहात चटपटीत खाऊ नेण्यासाठी केला असा जुगाड :

चित्रपटगृहात बाहेरील पदार्थ आणण्यास सक्त मनाई आहे; पण तुम्ही चित्रपटगृहात पदार्थ विकत घेऊन त्याचा आनंद घेऊ शकता. परंतु, चित्रपटगृहातील पदार्थांच्या किमती ऐकून आपल्यातील बरेच जण इकडचे खाद्यपदार्थ विकत घेत नाहीत. याच गोष्टीला अनुसरून हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. चित्रपटगृहात पदार्थ नेण्यासाठी हा अनोखा जुगाड करण्यात आला आहे.

मुंबईकर प्रत्येक गोष्टीसाठी जुगाड शोधून काढतात याचं उत्तम उदाहरण या व्हिडीओत पाहायला मिळालं आहे. तसेच हा व्हिडीओ मनोरंजनाच्या दृष्टीनं बनवण्यात आला आहे. @alfeshh या युजरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करून ‘द जीनियस हॅक’ असं नाव दिलं आहे. हा युजर सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर असून : ‘अल्फेश शेख’ असं या तरुणाचं नाव आहे. व्हिडीओ पाहून ‘स्विगी’च्या (swiggy) अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून “अ वर्गातील सर्वांत हुशार विद्यार्थी” अशी विनोदी कमेंट करण्यात आली आहे. अनेकांना हा व्हिडीओ बघून हसू आवरणं कठीण जातंय.