सोशल मीडियावर मेट्रोमधील घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात हे तुम्हाला माहित असेलच. कधी कोणी मेट्रोमध्ये डान्स करते तर कोणी भांडण करत असते. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी मेट्रो नेहमी चर्चेत असते. सध्या पुण्याची मेट्रो चर्चेत आली आहे. कारण एक पुणे मेट्रोमध्ये एक तरुणाने चक्क सायकल घेऊन प्रवास केला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होतोय तरुणाचा सायकलसह प्रवासाचा व्हिडीओ

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अनिकेत जगताप नावाच्या इंस्टाग्राम अकांउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की,”एक तरुण लिफ्टमध्ये सायकल घेऊन शिरतो. त्यानंतर एक कर्मचारी त्याची तपासणी करतात आणि कुपन वापरून तो सायकलसह मेट्रो स्टेशनवर प्रवेश करतो. त्यानंतर मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर उभा असलेला दिसतो जिथे त्याची सायकल देखील उभी केली आहे आणि मागच्या बाजून मेट्रोची ये-जा सुरू आहे. त्यानंतर एका मेट्रोमध्ये तो सायकलसह प्रवेश करतो. इतर प्रवासी त्याच्यकडे आश्चर्याने पाहतात. तरुण एका स्टेशनवर मेट्रोमधून बाहेर पडतो. त्यानंतर मेट्रो स्टेशनवर तो चक्क सायकल चालवताना दिसत आहे. त्यानंतर कुपन वापरून तो पुन्हा स्टेशनच्या बाहेर पडतो. सायकल घेऊन धावत्या जिन्यावरून मेट्रोस्टेशनच्या बाहेर पडतो.”

हेही वाचा – सोलो डेटिंग ट्रेंड म्हणजे काय भाऊ? सोशल मीडियावर का व्हायरल होतोय #Masterdating; तुम्हीदेखील करू शकता ट्राय

हेही वाचा – नारळापासून कशी बनवतात जेली; अचंबित करणारा हा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल; एकदा पाहाच …

नेटकऱ्यांनी केल्या मजेशीर कमेंट्स

तरुणाचा मेट्रोमध्ये सायकलसह प्रवास पाहणे फारच रंजक आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला आहे. अनेकजण त्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एकजण उपाहास करत म्हणतो, ”हा काय नवीन ट्रेंड सुरू केलाय, मी तर बुलेट घेऊन जाणार” तर दुसरा म्हणतो, ”मेट्रो ट्रॅकवरून सायकल चालव” तिसरा व्यक्ती म्हणतो, तू तर थेट विदेशात गेल्यासारखता वाटतोय” चौथा व्यक्ती विचारतो, सायकलचे जास्त पैसै लावले का? त्यावर उत्तर देत अनिल जगातापने सांगितले, ”कोणतेही जास्तीचे चार्जेस नाही. फक्त तुमचे तिकिट.”

हेही वाचा – रेस्टारंटने बिलावर लिहिली होती शिवी; ग्राहकाने तक्रार केल्यानंतर आले खरे कारण समोर

तुम्हाला करता येईल का सायकलसह मेट्रोमध्ये प्रवास

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नक्कीच असा प्रश्न पडला असणार की मेट्रोमध्ये सायकलसह प्रवास करण्याची परावनगी आहे का? तर उत्तर आहे होय. तुम्ही सायकलसह मेट्रोमध्ये प्रवास करु शकता. पुणे मेट्रोमध्ये सायकल घेऊन प्रवास करण्याची मुभा दिल्याबाबत एक परिपत्रक जाहीर केले होते. तुम्ही पुणे मेट्रोच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ याबाबत सविस्तर माहिती मिळवू शकता.

कसा करु शकता सायकल घेऊन मेट्रो प्रवास

केवळ मेट्रोच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नव्हे तर सायकल घेऊन तुम्ही थेट मेट्रोत प्रवास करू शकता. यासाठी वेगळं तिकीट काढण्याची ही गरज नाही. ही सायकल तुम्ही लिफ्टने मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जाऊ शकता. त्यानंतर तिकीट दाखवून तुम्हाला मेट्रोत तुम्हाला प्रवेश करता येतो. प्रवेश केल्यानंतर मेट्रोच्या दोन्ही बाजूच्या कोपऱ्यात सायकल पार्क करता येते. मग तुमचे स्टेशन आले की मेट्रोतून सायकलसह बाहेर पडू शकता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man traveled in pune metro with a bicycle the video is going viral can we travle in metro with bicycle snk
Show comments