Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. तुम्ही भन्नाट संदेश लिहिलेले पोस्टर हातात घेऊन रस्त्यावर उभे असणाऱ्या तरुणांचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात पोस्टर घेऊन भर रस्त्यावर उभा आहे. तरुणाने लग्नासाठी कशी मुलगी पाहिजे, हे या पोस्टरवर लिहिलेय. तरुणाचे पोस्टर पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. काही लोकांना हसू आवरणार नाही.

success story police officer competitive examination education government service mpsc upsc marathi onkar gujar
VIDEO: अखेरचा हा तुला दंडवत…दीड फुटाचा डेस्क अन् त्यावर गाळलेला घाम; सहाय्यक कृषी अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
TISS Mumbai PSF students
TISS Banned PSF: डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेवर TISS मुंबईने बंदी का आणली?
Tata Curvv Ev Waiting Periods Extended From 14 Days To 56 Days After Launch Tata Curvv EV
Tata Curvv EV: ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी तुटून पडले ग्राहक; लाँचिंगनंतर वेटिंग पीरियड पोहचला चक्क ५६ दिवसांवर
What happened to South Asian University after the Chomsky case
‘चॉम्स्की प्रकरणा’तून साउथ एशियन युनिव्हर्सिटीचे काय झाले?
Shreyas Iyer Helps Poor Woman with Money Video Viral
Shreyas Iyer: “एक मिनिट थांबाल…”, श्रेयस अय्यर दिसताच पैसे मागू लागली गरीब महिला, कारमध्ये बसला अन्… VIDEO व्हायरल
kolkata rape case
Kolkata Rape Case : पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी विद्यार्थिनीला अटक; ममता बॅनर्जींविरोधातही आक्षेपार्ह टीप्पणी!
How to transfer a voter ID card
लग्नानंतर मतदान ओळखपत्र नवीन पत्त्यावर ट्रान्सफर कसे करायचे माहितीये का? अवघ्या ७ सोप्या स्टेप्समध्ये; जाणून घ्या प्रक्रिया

“सरकारी नोकरी करणारी बायको पाहिजे..”

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. त्याने त्याच्या हातात पोस्टर धरले आणि हे पोस्टर घेऊन तो भर रस्त्यावर उभा आहे. त्या पोस्टरवर लिहिलेय, “लग्नासाठी सरकारी नोकरी करणारी मुलगी पाहिजे. मी स्वत: सर्व सोडून घर जावई होऊन राहणार”

हेही वाचा : Mumbai: मुंबई दर्शन करणाऱ्या कावळ्यांचा VIDEO; नेटकऱ्यांना हे दृश्य पाहून आठवला हा प्रसिद्ध चित्रपट; म्हणाले, ‘उर्वशी-उर्वशी गाण्याचे…

तरुणाचे हे पोस्टर पाहून तुम्हालाही हसू येईल. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा तुम्हाला काही तरुण, तरुणी, महिला पुरुष हे पोस्टर पाहून हसताना दिसत आहे. काही लोकांनी या तरुणाचा व्हिडीओ शूट केला आहे. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांना या पोस्टरवरील मेसेज वाचून हसू आवरत नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO: दागिने घातले, हाराने सजवले अन् केकऐवजी ठेवलं हे समोर; सोंड हलवत धन्यवाद म्हणणाऱ्या ‘हत्ती अखिला’च्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन पाहा

original_poster_boy_hindustan_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुमच्याकडे कोणती मुलगी आहे?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी घरीच ठीक आहे घरजावई अजिबात नाही” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान बोलला तुम्ही” आणखी एका युजरने लिहिलेय, “सरकारी नोकरी करणारा नवरा पाहिजे, असं ऐकलेलं पण बायको पाहिजे, हे पहिल्यांदा ऐकतोय.” हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. तुम्ही सोशल मीडियावर अशा अनेक तरुणांचे व्हिडीओ पाहिले असेल जे हातामध्ये असे मजेशीर मेसेज लिहिलेले पोस्टर घेऊन रस्त्यावर उभे राहतात.