सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपणला धक्का देणारे असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये स्नॉर्कलिंग करणाऱ्या माटेओ नावाच्या तरुणावर शार्कने हल्ला केल्याचं दिसत आहे. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या किनार्‍याजवळ घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणावर शार्कने हल्ला केल्याची घटना त्याच्याच कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ माटेओने इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माटेओ समुद्राच्या तळाशी शार्कपासून स्वत:ची सुटका करण्यासाठी धडपड करत असल्याचं दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही थरारक घटना ८ डिसेंबरला घडली आहे, तर या घटनेनंतर चार दिवसांनी मॅटिओने सोमवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मोटेओने लिहिलं, “शार्कने माझ्यावर हल्ला केल्यानंतर मी व्हिडीओ शूट करायला सुरुवात केली. मी त्याच्या तावडीतून सुटू शकेन असे मला वाटलं नव्हतं. या हल्ल्यात मी माझ्या शरीरातील खूप रस्त घालवलं आहे शिवाय मला माझा पाय देखील गमवावा लागला आहे. आता माझा पाय पूर्णपणे कापून टाकतील की अर्धवट काढतील मला माहिती नाही, परंतु आता त्याचा काहीही फरक पडत नाही. तुम्ही माझ्यासाठी हिरो आहात. तुमच्या मेसेज आणि कॉलमुळे मला ताकद मिळके. माझे एकच स्वप्न आहे, ते म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा भेटणे.”

हेही पाहा- श्वास न घेता, खोल समुद्राच्या अंधारात पोहोचला, मासा नव्हे माणसाचा चमत्कार.. विश्वासच बसणार नाही, Video चर्चेत

शार्कशी भिडला तरुण –

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, किनाऱ्याजवळ स्नॉर्कलिंग करत असताना अचानक मोटेओवर शार्क हल्ला करतो. या हल्ल्या दरम्यान त्याचे कपडे फाटलेले आणि आजूबाजूचे पाणी रक्ताने लाल झाल्याचंही दिसत आहे. मात्र, या हल्ल्यातून त्याने स्वतःला धाडसाने वाचवलं, व्हिडिओमध्ये शार्कपासून स्वत:ची सुटका करण्यासाठी मोटेओ संघर्ष करताना दिसत आहे. तर व्हिडीओच्या शेवटी वेदनेने तो ओरडत असल्याचंही पाहायला मिळत आहे.