मागील काही काळापासून हृदयविकाराच्या झटक्याने नागरिकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. कधी लोक जिममध्ये व्यायाम करायला गेले असता अचानक जमिनीवर कोसळून त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर आपण पाहिले आहेत. सध्या अशाच एका तरुणाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ज्यामध्ये एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मेडिकलच्या दुकानासमोर दुर्देवी मृत्यू झाला आहे. शिवाय या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला त्याला मृत्यूआधी काय वेदना झाल्या ते सर्व मेडिकलमधील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं आहे. हा व्हिडीओ म्हणजे, मृत्यू कसा येतो? हे प्रत्यक्षात दाखवणारे भयावह दृश्य असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
हेही पाहा- काळ आला होता पण…; ट्रकखाली सापडूनही महिलेला मिळाले जीवदान, पाहा थक्क करणारा Video
व्हायरल होत असलेले सीसीटीव्ही फुटेज हे फरीदाबादमधील ३३ फुटा रोडचे आहे. येथील एक २३ वर्षीय तरुण ओआरएस घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेला होता, त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि काही मिनिटांत त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी या तरुणाला प्रचंड त्रास होत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. कारण, तो मेडिकलमध्ये गेला असता, सतत छातीवर हात ठेवताना आणि मेडिकलच्या काऊंटवर डोके टेकवताना दिसत आहे.
हेही पाहा- Video: कपड्यांमुळे निर्दयी जमावाची मुलीला लाथा बुक्क्यांनी मारहाण, म्हणाले “असे कपडे पुरुषांना…”
दरम्यान, त्याला जास्तीचा त्रास झाल्यामुळे तो थेट जमिनीवर कोसळ्यालचंही व्हिडीओत दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ म्हणजे मृत्यू कसा येतो? याचेच उदाहरण असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव संजय असे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील रहिवासी आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, संजय मेडिकल दुकानामध्ये औषध घेत असताना अचानक खाली पडला, संजय पडल्याचे पाहून मेडिकलमधील मुलगा घाबरतो आणि त्याच्याकडे धाव घेतो. ही संपूर्ण घटना या मेडिकलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ @tricitytoday नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून तो शेअर करताना व्हिडीओत्याच्या कॅप्शनमध्ये मृत्यूच लाईव्ह कॅमेऱ्यात कैद झाला आहे, असं म्हटलं आहे.