Viral Video : सोशल मीडियावर मकरसंक्रांतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही व्हिडीओ मजेशीर आहेत तर काही व्हिडीओ थक्क करणारे आहेत. उखाणे, तिळगुळापासून तयार केलेल्या पदार्थांच्या रेसिपी, गाणी डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक कॅलिग्रॅफीची कला अवगत असलेला तरुण काळ्या फळावर सुंदर संदेश लिहिताना दिसत आहे. हा संदेश वाचून तुम्हीही थक्क व्हाल. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणता संदेश लिहिलाय, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (a young man wrote a beautiful message on Makar Sankranti video goes viral on social media)

Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
almost falls off cliff
उंच कड्यावर चढता चढता ती अचानक घसरली, खोल दरीत कोसळणार तेवढ्यात…. हृदयाचा थरकाप उडवणारा Video Viral
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?

“माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण फळ्यावर सुंदर संदेश लिहिताना दिसेल. या सुंदर हस्ताक्षरामध्ये खालील संदेश लिहिताना दिसतो.
तो लिहितो,
“तुम्ही तिळगुळ घ्या नाहीतर
हत्तीवर बसून साखर वाटा
माणूस तेव्हाच गोड बोलतो
जेव्हा त्याला गरज असते…!”

हेही वाचा : Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच

मकरसंक्रातीला एकमेकांना तिळगुळ देत मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या जातात. तिळगुळ देताना ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ असं म्हणतात. एकमेकांतील द्वेष, राग ,वैर आणि कटुता विसरून एकमेकांबरोबर स्नेहसंबंध निर्माण व्हावेत, याचे प्रतीक म्हणून तिळगूळ दिला जातो. याच पार्श्वभूमीवर तरुणाने हा मेसेज लिहिला आहे जो सध्याच्या दुनियादारीविषयीचा त्याचा अनुभव सांगताना दिसतो.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : मुंबई लोकलमध्ये “सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची” गाण्यावर महिलांचा भन्नाट डान्स; मकर संक्रांतनिमित्त VIDEO तुफान व्हायरल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अगदी बरोबर. सुंदर हस्ताक्षर” तर एका युजरने लिहिलेय, “सर तुम्ही गोड बोला नाहीतर नका बोलू पण तुमच हस्ताक्षर खरच खुप मस्त आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “100% बरोबर आहे भाऊ कामापुरते बोलता सगळे” एक युजर लिहितो, “बरोबर आहे सर….मनातील शब्द आहे…” तर एक युजर लिहितो, “मराठी सणांची टीका मराठी माणूसच करतो आणि मग परप्रांतीयवर ओरडतात. हे काय बरोबर नाही.” आणखी एका युजर लिहितो, “खरं बोललास भावा” अनेक युजर्सना हा संदेश आवडला असून त्यांनी सहमती दर्शवली आहे.

Story img Loader