पावसाळ्यात धबधबा, डोंगर दऱ्यांमध्ये वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या लोकांना सावध राहण्याचा वारंवार इशारा देऊनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत: चा जीव धोक्यात टाकतात. काही दिवसांपूर्वीच लोणवळामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण आणि ताम्हिणी घाटमध्ये एक व्यक्ती वाहून गेले होते. दरम्यान गेल्याच आठवड्यात सेल्फीच्या नादात एक सोशल मिडिया इन्फ्ल्युएन्सर अन्वीचा मृत्यू़ झाला होता. सोशल मिडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होता असतात. दरम्यान सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती धबधब्यामध्ये भिजण्याचा आनंद घेत असताना तो अचानक घसरला आणि तो खडकांवर आपटत खाली पडला. व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

हेही वाचा – पावसाळ्यात धबधब्यावर जाण्याआधी हा Video पाहा! अचानक पाण्याचा जोर वाढला अन् अडकले ७० पर्यटक

हेही वाचा – वैतागलेल्या नागरिकांनी खड्ड्यांमध्ये लावली भाताची रोपं, Viral Videoने केली सरकारची पोलखोल

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकतो की एक व्यक्ती धबधब्याच्या ठिकाणी उंच ठिकाणावरून घसरून खाली पडताना दिसत आहे. पाण्याचा प्रवाह खूप जास्त नाही पण ओलाव्यामुळे दगड निसरले झाले आहे. त्यामुळे पडता क्षणी तो तरुण खडकांवून सटकून खाली खाली जातो. एका ठिकाणी त्याचे डोके एका खडकावर देखील जोरात आपटतो. एका ठिकाणी खडकांजवळ जाऊन तो अडकतो. एवढ्या जोरात आपटल्यानंतरही सुदैवाने त्याचा जीव वाचतो. घसरगुंडीवरून घसरल्याप्रमाणे तो व्यक्ती खाली घसरताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून क्षणभर नेटकऱ्यांचा श्वास रोखला जात आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – ‘कॉलर पकडली, बुक्या मारल्या…पुणे पोलिसाची PMT बसचालकाला बेदम मारहाण, Video Viral

इंस्टाग्राम tech_otp_dilraj वर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले की, भेरू धाम धबधबा सूसाईड पॉइंट होत चालला आहे. तसेच व्हिडीओवर दिसणाऱ्या मजकूरमध्ये सांगितले आहे की, घसरून पडल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने तरुण बचावला पण त्याची छोटीशी चूक त्याच्या जीवावर बेतली असती. धबधब्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर सावधगिरी बाळगली पाहिजे अन्यथा आपल्या जीवावर बेतू शकते.