Shocking video: काही व्यक्तींमध्ये जरा जास्तच उत्साह असतो. याच उत्साहाला उधाण आलं की उत्साह कधी अनाठायी धाडसामध्ये बदलून जातो ते कळतही नाही. कधी कधी काही धाडसी प्रयोग यशस्वी होतात, पण हेच प्रयोग अंगलट येऊन अगदी जीव जाईपर्यंतची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला बघतच असतो. दररोज जे काही अपघात होतात, त्यातले २० टक्के अपघात तरी विनाकरण काहीतरी अतिधाडस केल्याने हतात. आता हेच बघा ना, पाण्याच्या ठिकाणी मस्ती करू नका असे अनेकदा सांगितले जाते; मात्र तरीही काही लोक ऐकत नाहीत. मग याच्या परिणामांना सामोरं जावं लागतं. असाच एक धबधब्यावरील स्टंट एका व्यक्तीच्या चांगलाच अंगलट आला आहे. एक व्यक्ती धबधब्याच्या टोकावर जाऊन स्टंटबाजी करताना अचानक घसरला आणि तो खडकांवर आपटत खाली पडला. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

काही मंडळींना स्टंटबाजीची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस त्यांच्या अंगाशीसुद्धा येते. प्रसिद्धी मिळविण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

Alone giraffe's dilemma from a herd of lions
वाईट अंत! एकट्या जिराफाची सिंहाच्या कळपाकडून कोंडी; पुढे असे काही घडले की… Viral Video पाहून उडेल थरकाप
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Young Man Swept Away by Flood
एवढी घाई कशाची! पुराच्या पाण्यात वाहून जात होता तरुण, वेळीच लोक धावून आले; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
rahul gandhi statement in america, prime minister narendra modi
राहुल गांधीनी मोदींच्या पावलावर पाऊल टाकलं तर एवढं काय बिघडलं?
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
tasty wheat flour modak
Modak Recipe: एक वाटी गव्हाच्या पीठात झटपट बनवा उकडीचे मोदक; तांदळाच्या मोदकांपेक्षा लागतील भारी
A bull Picked up a four-wheeler vehicle with full of people
बापरे! बैलाने चक्क माणसांनी भरलेली चारचाकी गाडी उचलली; Video पाहून येईल अंगावर काटा
how to avoid Discord in the family
सांदीत सापडलेले… : मतभेद

नेमकं काय घडलं

अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे निसर्ग खुलला असून पर्यटक अनेक ठिकाणी फिरायला जात आहेत. पर्यटनस्थळे बहरली असली तरी तिथे पाहायला जाणं, तेही एवढ्या पावसाळ्यात धोकादायक आहे. पर्यटक फिरायला गेल्यावर अनेक दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. यामध्येही अतिशहाणपणा या व्यक्तीच्या जीवावर बेतला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा व्हिडीओ बघून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. या धबधब्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पडत आहे आणि धबधब्याच्यावर टोकाला हा व्यक्ती कपडे न घालता तिथे उभा आहे. यावेळी तो हालचाल करताना अचानक त्याचा पाय घसरतो आणि ही व्यक्ती उंच धबधब्यावरून थेट खाली असलेल्या खडकावर कोसळते. धबधब्याखाली पाण्याचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांमध्येही या घटनेनंतर आरडा-ओरडा होतो. अनेक जण यावेळी या तरुणाच्या मदतीला पुढे जाताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं; तावडीत सापडूनही बिबट्या करू शकला नाही कुत्र्याची शिकार; का ते Video मध्ये पाहा

आग, हवा आणि पाण्याशी कधीही खेळू नये, कारण ते जीवघेणं ठरू शकतं असं म्हणतात. कधी व्हिडीओ तर कधी सेल्फीच्या नादात अनेक वेळा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून तरुणांनी यातून धडा घेणे गरजेचे आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर baba_mandhare_32532 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ही घटना नेमकी कुठे घडली, याची माहिती मिळू शकलेली नाही.