Shocking video: काही व्यक्तींमध्ये जरा जास्तच उत्साह असतो. याच उत्साहाला उधाण आलं की उत्साह कधी अनाठायी धाडसामध्ये बदलून जातो ते कळतही नाही. कधी कधी काही धाडसी प्रयोग यशस्वी होतात, पण हेच प्रयोग अंगलट येऊन अगदी जीव जाईपर्यंतची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला बघतच असतो. दररोज जे काही अपघात होतात, त्यातले २० टक्के अपघात तरी विनाकरण काहीतरी अतिधाडस केल्याने हतात. आता हेच बघा ना, पाण्याच्या ठिकाणी मस्ती करू नका असे अनेकदा सांगितले जाते; मात्र तरीही काही लोक ऐकत नाहीत. मग याच्या परिणामांना सामोरं जावं लागतं. असाच एक धबधब्यावरील स्टंट एका व्यक्तीच्या चांगलाच अंगलट आला आहे. एक व्यक्ती धबधब्याच्या टोकावर जाऊन स्टंटबाजी करताना अचानक घसरला आणि तो खडकांवर आपटत खाली पडला. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा