Viral Ukhana Video : उखाणा हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लग्न समारंभ असो किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी आवडीने उखाणा घेतला जातो. उखाणा म्हणजे लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे, होय. पूर्वी महिला पतीचे नाव घेत उखाणा म्हणायच्या पण आता पुरुषही आवडीने उखाणा घेताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नवविवाहित तरुण भन्नाट उखाणा घेताना दिसतो. त्याचा हा उखाणा ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Viral Video : a young newly wed guy said amazing ukhana for his wife and asked his sister how is their sister in law)
तरुणाने घेतला भन्नाट उखाणा
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक नवविवाहित जोडपे दिसेल. हा व्हायरल व्हिडीओ गृहप्रवेशाच्या वेळीचा आहे. दारामध्ये दोन बहिणी उभ्या आहेत आणि भावाला उखाणा घेण्यासाठी आग्रह धरताना दिसत आहे. तेव्हा भाऊ म्हणजेच नवविवाहित तरुण उखाणा घेतो. उखाणा घेताना तरुण म्हणतो, “नाव घे म्हणून दरवाज्यावर उभ्या आहेत आडव्या बहिणी, स्वातीचं नाव घेतो, कशी वाटली वहिनी?” हा भन्नाट उखाणा ऐकून बहिणी जोरजोराने हसताना दिसतात. तरुण सुद्धा लाजतो आणि नवी नवरी म्हणजेच त्याची पत्नी सुद्धा हसताना दिसते.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
अभिजीत सावंत या तरुणाने the_abhijeet_sawant या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जमतय का..?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कडक भावा” तर एका युजरने लिहिलेय, “एक नंबर जोडी” आणखी एका युजरने लिहिलेय, “लय भारी आहे भावा वहिनी” एक युजर लिहितो, “वाह!! रे माझ्या पठ्या, एक नंबर उखाणा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी या तरुणाचे कौतुक केले आहेत. हा उखाणा सेव्ह करुन ठेवतो, असेही काही लोकांनी लिहिलेय. यापूर्वीही असे अनेक उखाण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत पण हा व्हिडीओ तुम्हाला सर्वात हटके आणि भन्नाट वाटला असेल.