Viral Ukhana Video : उखाणा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार आहे. विवाह सोहळा असो किंवा कोणतेही शुभ कार्यादरम्यान पत्नी पतीचे नाव घेत लयबद्ध पद्धतीने उखाणा घेते. हल्ली पुरुष मंडळी सुद्धा आवडीने पत्नीसाठी उखाणा घेताना दिसतात. सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरून हसायला येते. काही तरुणी मजेशीर रील बनवण्यासाठी उखाण्याचे व्हिडीओ बनवताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी मराठमोळा लूकमध्ये भन्नाट उखाणा घेताना दिसते. तिचा हा उखाणा ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही आणि तुम्ही डोकं धराल. (Viral Ukhana Video : a young woman said funny ukhana for future husband video goes viral)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी दिसेल. तिने सुंदर साडी नेसली आहे. तिने नाकात नथ आणि गळ्यात दागिने घातले आहेत, कपाळावर चंद्रकोर टिकली लावली आहे आणि केसांमध्ये गजरा माळला आहे. मराठमोळ्या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिने एक भन्नाट उखाणा घेतला आहे. उखाणा घेताना ती म्हणते, “सप्तपदीच्या वाटेवर मी नेहमी तुला साथ देईन, सप्तपदीच्या वाटेवर मी नेहमी तुला साथ देईन… तुझ्यासाठी दोन शर्ट घेताना माझ्यासाठी चार साड्या आणि दोन ड्रेस घेईन” हा भन्नाट उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : जावई असावा तर असा! कोरियन जावयाने सासू-सासऱ्यांसाठी बनवला गरमा गरम मसाला चहा, पाहा Viral Video
पाहा व्हायरल व्हिडीओ
makeup_artist_kiranghule या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बिल पण तुच दे” तर एका युजरने लिहिलेय, “भन्नाट उखाणा घेतला” अनेक युजर्सना हा उखाणा आवडला असून त्यांनी हसण्याचे आणि हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. जवळपास १८ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
काही महिन्यांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये तरुणीने असाच एक भन्नाट उखाणा घेतला होता. उखाणा खालील प्रमाणे होता – ““गरम गरम भजी बरोबर नरम नरम पाव.. राव दिसतात बरे पण खातात खूप भाव” हा व्हिडीओ त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता.