Viral Video : आपल्यातील काही जण चांगला जोडीदार मिळाला की रिलेशनशिपमध्ये जातात, तर काही जण परफेक्ट जोडीदाराच्या शोधात बरेच वर्ष एकटे राहतात; तर अनेक जण याला अपवाद असतात. काही जण ‘एकटं राहून आनंदी जीवन जगण्यात समाधान मानतात.’ पण, अशातच अनेक मित्र-मैत्रिणी अशा सिंगल लोकांना चिडवताना दिसतात आणि म्हणतात, तू अजून सिंगल आहेस का ? तर ही गोष्ट ऐकून काही जण मनाला लावून घेतात, तर काही जण या गोष्टी अगदीचं मस्करीत घेतात. आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. एका तरुणीने सिंगल लोकांसाठी एक खास उखाणा घेतला आहे, जो तुमचेही मन जिंकेल.
अनेकदा लव्ह किंवा अरेंज पद्धतीने लग्न केलेल्या जोडप्यांना कुटुंब आणि मुलंबाळं सांभाळताना पाहून, आपण सिंगल सुखी आहोत हा निर्णय योग्य वाटतो; तर यालाच अनुसरून तरुणीने हा मजेशीर उखाणा घेतला आहे. पारंपरिक कुर्ता आणि नथ घालून तरुणी अगदी सुंदर हावभाव देत हा मजेशीर उखाणा म्हणताना दिसते आहे. व्हिडीओत तरुणीने, ‘सर्व मित्र-मैत्रिणींची लग्न झाली ते उडवतात माझी टिंगल, जेव्हा त्यांची मुले भोकाड पसरतात तेव्हा मी म्हणते; हुश्श मी आहे सिंगल…’ असा मस्त आणि मजेशीर उखाणा तरुणीने घेतला आहे. तरुणीने घेतलेला मजेशीर उखाणा एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाचं.
हेही वाचा… “मला वाटलं सचिन मेला, मी मुद्दाम..”, शोएब अख्तरची धक्कादायक कबुली! तेंडुलकर, धोनी विरुद्ध रचला डाव
व्हिडीओ नक्की बघा :
उखाणा घेऊन सिंगल लोकांचे जिंकले मन :
खास करून लग्न समारंभात जोडप्यांकडून उखाणा म्हणून घेतले जातात. उखाणा म्हणजे नवरा-बायकोचं थेट नाव न घेता काव्यपंक्तींमध्ये गुंफून नाव घेणे होय. तसेच या दरम्यान आजूबाजूचा माहोलदेखील मनोरंजक होतो, हेसुद्धा आपण सगळ्यांनी अनुभवले असेल. पण, या व्हिडीओत तरुणीने कोणत्याही जोडीदाराचं नाव न घेता, रोजच्या जीवनाशी निगडित विषयावर अगदी मजेशीर उखाणा सादर करून दाखवला आहे. तसेच उखाणा सादर करणाऱ्या तरुणीचे नाव ; ‘मृदला खैरे’ असे आहे. तसेच तरुणी, @ इंडिगो एअरलाइन लीड करते आणि एक प्रसिद्ध ब्लॉगरसुद्धा आहे. तसेच मराठी उखाणे घेणारी स्पेशलिस्ट आहे, असे तरुणीच्या इन्स्टाग्राम अॅपवरील बायोमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.
मजेशीर उखाणा @flyhighbantai या तरुणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करून; ‘हॅप्पी सिंगल’ असे या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे. अनेक सिंगल लोकांना हा उखाणा पटला असून ते अगदी मजेशीररित्या कमेंट करताना दिसून आले आहेत. तसेच तरुणीने घेतलेला हा अनोखा उखाणा अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहे आणि सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे.