पावसाळ्यात सृष्टीचे सौंदर्य बहरते. डोंगर हिरवेगार चादर पसरल्यासारखे दिसतात, डोंगर-दऱ्यांमध्ये पांढरे शुभ्र धबधबे वाहताना दिसतात. निसर्गाचे हे सौंदर्य नक्कीच पाहण्यासारखे असते पण डोंगर-दऱ्या, धबधब्यांसारख्या पर्यटन स्थळी भेट देताना सावध राहिले पाहिजे अन्यथा आपली एक चूक आपले संपूर्ण आयुष्य उध्वस्त करू शकते. काही दिवसांपूर्वीच लोणावळ्यातील भुशी डॅम येथे वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जण जोरदार पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले. तर ताम्हिणी घाट येथे एका तरुणाने धबधब्यामध्ये उडी मारली आणि जोरदार पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहून गेला. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पावसाळ्यात पर्यटळ स्थळी भेट दिल्यानंतर योग्य काळजी घेतली नाही तर अशा घटना घडत असतात. वारंवारं सांगूनही अनेकदा लोक सावधगिरी बाळगत नाही आणि मृत्यूला आमंत्रण देतात. दरम्यान सध्या सोशल मीडियावर अशाच एका थरारक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ डोंगराळ भागातील असल्याचे दिसते जिथे काही ट्रेकर्स दिसत आहेत. डोंगरामध्ये ट्रेकर बसून पुढे जाऊ शकतो एवढीच जागा आहे असते दिसते. एकीकडे ट्रेकर्स हळू हळू बसूनच पुढे सरक आहेत. व्हिडीओच्या पाश्वभूमीमध्ये एके ठिकाणी पायऱ्यांवरून एक महिला खाली जाताना दिसत आहे. महिला अगदी सहजपणे चालत असते तेवढ्यात तिचा पाय घसरतो आणि ती थेट दरीमध्ये कोसळते. कोणाला काही समजण्याआधीच ती दरीत पडते त्यामुळे कोणीही तिला वाचवू देखील शकत नाही. थरारक अपघात कॅमऱ्यामध्ये कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडीओ नक्की कुठला आहे हे अद्याप समजले नाही पण हा व्हिडीओ बाहेरच्या देशातील असावा असा अंदाज काही नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. व्हिडीओ पोस्ट करण्याचा हेतू लोकांना पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी सावध करण्याचा आहे.

हेही वाचा – “भूक किती वाईट असते ना!” पंचपक्वान्नाने भरलेल्या ताटाच्या पोस्टरला हात लावून चिमुकल्याने भरलं पोट, हृदयद्रावक Video Viral

इंस्टाग्रामवर marathi_source नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “प्रिय मित्र-मैत्रिणींनो, डोंगरदऱ्या आणि धबधबे , पावसाळी पर्यटन स्थळे जेवढं मोहक तेवढंच घातक असतात. सेल्फी किंवा रिल्स पायी आपला अमूल्य जीव धोक्यात घालू नका. नसते धाडस टाळा. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अचानक वाढतो. खडक, रस्ते शेवाळाने घसरडे होतात त्यामुळे जीव धोक्यात घालू नका. सुरक्षिततेला प्राधान्य द्या.”

हेही वाचा – प्रवाशांच्या जीवाशी खेळ! ओव्हरटेकिंग करण्याचा नादात तीन बसचा झाला असता मोठा अपघात; पाहा थरारक Video Viral

व्हिडीओवर कमेंट करताना एकाने सांगितले की, “व्हिडिओ आपल्याकडचा नाही तरी पण पावसात असे ट्रेकिंग धोकादायक असतात खूप. पण सध्या सोशल मीडियावर मिरवण्यासाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खूप लोक कसले हि अचाट प्रकार करत आहेत. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आणि नियम लागू असतात हे काही लोकांना समजत नाही.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young woman was coming down the stairs her foot slipped and she fell directly into the valley video viral be careful while visiting hills and valleys waterfalls during monsoon snk
Show comments