आधार कार्डच्या अधिकृत ट्विटर अकाऊंवरून गेल्या आठवड्यात एक ट्विट करण्यात आले. हे ट्विट आता चर्चेचा विषय बनला आहे याचे कारणही तसेच आहे म्हणा कारण आधारच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन चक्क ‘lksdclmdn clksd’ असं काही तरी ट्विट करण्यात आले त्यामुळे आधारचे हे ट्विटवर अकाऊंट हॅक करण्यात आले की काय अशी भिती सगळ्यांना वाटून राहिली. नंतर मात्र या ट्विटची चर्चा झाल्यानंतर आधारच्या ट्विटर अकाऊंटवरून याचे स्पष्टीकरण करण्यात आले.

वाचा : नववर्षातील पहिल्या ट्यूना माशावर चक्क ४ कोटींची बोली!

काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्यानंतर देशातील अशीच महत्त्वाची ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात येतील अशी भितीही व्यक्त करण्यात आली होती. अशातच शुक्रवारी आधारच्या आधिकृत आकाऊंटवरून ‘lksdclmdn clksd’ असे ट्विट करण्यात आले. हे ट्विट आल्यानंतर सोशल मीडियावर याची खूप चर्चा झाली. अधिकृत अकाऊंटवरून करण्यात आलेल्या या ट्विटचा नेमका अर्थ काय असेल असा प्रश्न अनेकांना पडला. तर काहींनी हे अकाऊंट ब्लॉक झाले असल्याचाही तर्क काढला. पण नंतर मात्र याची जास्त चर्चा झाल्यावर त्याचा खुलासाही करण्यात आले. एका कर्मचा-याच्या कॉम्प्युटरवर हे अकाऊंट सुरू होते. कोणीतरी चुकून त्याच्या किबोर्डवर फाईल्स ठेवल्या आणि अशी अक्षरे टाईप झाल्याचे सांगण्यात आले. पण यावर सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

https://twitter.com/aap_ka_has/status/817444693629927425

https://twitter.com/ashwanirajtweet/status/817441594496446464

Story img Loader