केंद्र सरकारने आता आधार कार्डबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार दर १० वर्षांनी सर्वांना आपलं आधार कार्ड अपडेट करावं लागणार आहे. सध्या आधार कार्ड हे आपल्या जीवनातील एक महत्वाचा भाग बनलं आहे. शिक्षण, नोकरी ते सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आधार कार्डची गरज प्रामुख्याने भासते. याच आधारकार्डवरती जर आपली जन्मतारीख किंवा पत्ता चुकीचा भरला गेला असेल तर खुप समस्यांना सामोरं जावे लागायचं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा- खुशखबर! इंटरनेटशिवाय OTT वरील शो पाहता येणार; सरकार आणतय नवं तंत्रज्ञान, जाणून घ्या सविस्तर माहिती

आधार कार्डवरील माहिती चुकली असेल कर याआधी ती दोन वेळाच ती बदलता येत होती. मात्र, सरकारच्या नव्या निर्णयामुळे आता दर १० वर्षांनी आधार कार्डवरील माहितीमध्ये बदल करता येणार आहे. अनेक लोकांना नोकरीनिमित्त आपलं राहतं घर बदलावे लागते आणि आधार कार्डवर जुनाच पत्ता राहतो. त्यामुळे नवीन ठिकाणी रहायला जाणाऱ्यांना कमी अधिक प्रमाणात त्रास देखील होतो. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याचा निर्णय घेतला असून याबाबची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

त्यामुळे आता तुमचं आधार कार्ड बनवून दहा वर्ष झाली असतील तर ते तुम्हाला अपडेट करावं लागणार आहे. पहिल्या आधार कार्डवर जरी काही चुकीची माहिती भरली गेली असेल तर ती आता बदलता येणं सहज शक्य आहे. तसंच आधार कार्ड अपडेट करण्याच्या सक्तीमुळे अनेक बोगस आधार कार्ड बनवणाऱ्यांना आणि आधारचा गैरउपयोग करण्यांवर चांगलाच चाप बसणार आहे.

आणखी वाचा- BSNL Recharge Plan: Jio आणि Airtel ला टक्कर देण्यासाठी BSNL ने लाँच केला सर्वात स्वस्त Plan!

असे करा आधार अपडेट –

तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार अपडेट करणाऱ्या सेंटरवर जावं लागेल त्या ठिकाणी माहिती अपडेट करण्यासाठी विविध शुल्क आकारले जाते. तुम्हाला जो बदल करायचा आहे त्याचे निश्चित शुल्क भरुन आधार अपडेट करता येईल. आधार अपडेट करायला जाताना फोटो आईडी घेऊन जावं लागेल. तुम्ही जे आईडी घेऊन जाणार आहात त्यावरती तुमचा पुर्ण पत्ता असेल याची खबरदारी घ्या. शिवाय https://myaadhaar.uidai.gov.in/ या संकेत स्थळावर तुम्ही स्वत: देखील तुमचे आधार अपडेट करू शकता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadhaar card new guideline aadhaar card will have to be updated every 10th year government issued order jap