Viral Video : सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. अनेक पर्यटक या वातावरणात पावसाचा आनंद घेत फिरताना दिसत आहेत. किल्ले, गडकिल्ले, ट्रेकिंग आणि कोकणातील पर्यटकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोकं ‘आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं’ हा खेळ मातीच्या चिखलात खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या बालपणीची आठवण येऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, २५-३० लोकं चिखलात बसले आहेत आणि ‘आईचं पत्र हरवलं’ हा बालपणीचा खेळ खेळताना दिसत आहेत. हा खेळात खेळाडू हे गोलाकार बसलेले असतात. ज्याच्यावर राज्य असतं तो म्हणतो, ‘आईचं पत्र हरवलं’ तर बसलेले खेळाडू म्हणतात, ‘ते मला सापडलं.’ राज्य घेणारा खेळाडू बसलेल्या एका खेळाडूच्या मागे हळूच एखादी वस्तू किंवा चिठ्ठी टाकतो. ज्याच्या मागे चिठ्ठी किंवा वस्तू असते, तो राज्य असलेल्या खेळाडूला बाद करण्यासाठी धावतो, पण राज्य असलेला खेळाडू जर खेळाडूच्या रिकाम्या जागेवर जाऊन बसला की, ज्याच्या हाती चिठ्ठी राहते त्याला शिक्षा होते.
या व्हायरल व्हिडीओमध्ये हे लोकं तुम्हाला असाच खेळ खेळताना दिसत आहेत.विशेष म्हणजे ही लोकं चिखलात हा खेळ खेळत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : एक दोन नव्हे, तर चक्क पाच बॉल बोटांवर फिरवतो हा तरुण रेल्वेस्थानकावरील व्हिडीओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल…

maharashtra_gadkille या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आठवतोय का लहानपणीचा हा खेळ?”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सला त्यांच्या बालपणीची आठवण आली आहे. एका युजरने लिहिले आहे, “हा खेळ मला खूप आवडतो. बालपणी मी हा खेळ खूप खेळायचो.”
काही युजर्सनी या खेळाचे नाव ‘मामाचं पत्र हरवलं’ तर काही युजर्सनी या खेळाचे नाव ‘आईचं पत्र हरवलं’ असे सांगितले आहे. कदाचित महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत या खेळाला वेगवेगळ्या नावाने संबोधतात.