Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण त्यांचे डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या इन्स्टाग्रामवर एका आजीची जोरदार चर्चा सुरू आहे. या आजी वेगवेगळ्या गाण्यांवरील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.
सोशल मीडियावर आजींना ‘डान्सिंग दादी’ म्हणून ओळखल्या जाते. या आजींचे डान्स व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या त्यांचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये या आजींनी नऊवारी नेसली आहे आणि भन्नाट डान्स करताना दिसत आहे. ‘हमको आज कल है इंतजार’ या फेमस बॉलीवूड गाण्यावर आजी डान्स करत आहेत. आजींच्या स्टेप्स आणि हावभाव पाहून तुम्हाला माधुरी दीक्षितची आठवण येऊ शकते.
६५ वर्षांच्या या आजी दिसायला सुद्धा खुप सुंदर आहेत. त्यांचे लांब केस आणि चेहऱ्यावरील तेज पाहून कोणीही थक्क होईल.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हसत खेळत जगणं म्हणजे खरं आयुष्य जगणं असतं, आणि त्याला वायाच बंधन नसतं, उलट या वयात तर असंच आनंदी राहायला पाहिजे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स” आणखी एका युजरने लिहिलेय, “शब्द नाही बोलायला इतका छान डान्स करता आणि तुम्ही सुंदर आहात”
हेही वाचा : Optical Illusion : या फोटोमध्ये धोनी दिसतोय का? नीट क्लिक करून पाहा
ravi.bala.sharma’या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या अकाउंटवरुन आजींच्या डान्सचे अनेक व्हिडीओ यापूर्वीही शेअर करण्यात आले आहे.
हे अकाउंट या आजींचे असून इन्स्टाग्रामवर ३ लाखाहून अधिक त्यांचे फॉलोवर्स आहेत. विशेष म्हणजे या आजी बॉलीवूडच्या जुन्या आणि नव्या सर्व गाण्यांवर डान्स करताना दिसतात.