बॉलिवू़ड स्टार अभिनेता आमिर खान याच्या आगामी ‘दंगल’ चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ  दंगल करताना दिसत आहे. ‘दंगल’ चित्रपटाच्या ट्रेलवरुन तयार करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये बच्चे कंपनीमध्ये लोकप्रिय असणारे कार्टून दंगल करताना दिसत आहेत. लहान मुलांच्यात मोठ्या प्रमाणात कार्टूनची क्रेझ पहायला मिळत असली तरी ‘दंगल’ चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरवर तयार करण्यात आलेला हा व्हिडिओ सर्वच स्तरातील लोकांच्यात लोकप्रिय होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ‘दंगल’च्या ट्रेलरचा आवाज ऐकायला मिळत असला तरी चित्रपटातील पात्रांच्याऐवजी यामध्ये लोकप्रिय कार्टून दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडिओमध्ये पावरपफ कार्टून सीरीजमधील काही चित्रिकरण कट करुन जोडण्यात आले आहे. हा व्हिडिओ एखाद्या कार्टून चित्रपटाच्या ट्रेलर असल्याचे भासते. दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेताना बच्चे कंपनीला तर हा व्हिडिओ आनंद देतोच पण इतर वयाच्या लोकांनाही हा व्हि़डिओ बालपणाची आठवण करुन देईल असाच आहे. हा व्हिडिओ स्क्रिन पत्तीच्या फेसबुकवर तीन दिवासांपूर्वी म्हणजे २६ आक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडिओला ४ लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. यावरुन या व्हि़डिओला मिळणारी लोकप्रियता दिसून येते. नेटीझन्स हा व्हिडिओ पाहून आपल्या मित्रपरिवारामध्ये देखील हा व्हि़डिओ शेअर करत आहेत. परिणामी ९ हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून शेअरच्या  प्रमाणातच या व्हिडिओने लाईकसुद्धा मिळविल्या आहेत.

पावरपफ गर्ल्स दंगल नावाने व्हिडिओ तयार करणाऱ्यास त्याच्या कौशल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. हा व्हिडिओ तुम्हाला फक्त हसविणार नाही तर ज्याने हा व्हिडिओ तयार केला त्याचे तुम्ही देखील नक्कीच कौतुक कराल. पहा व्हिडिओ अमिरखान याच्या आगामी दंगल चित्रपटाचा व्हिडिओ १९ आक्टोबरला जारी करण्यात आला होता. आमिरचा बहुचर्तित चित्रपट २३ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.  सर्वात कमी दिवसांत सर्वाधिक पाहिला जाणारा ट्रेलर म्हणून ‘दंगल’चा उल्लेख केला जात आहे. या ट्रेलरमधले डायलॉगही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. ‘म्हारी लडकीया छोरो रे कम हे के’ या टॅगलाईनला फॉलो केले जात आहे. केवळ एक चित्रपट म्हणून नव्हे तर महिला सबलीकरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणूनही ‘दंगल’ चित्रपटाकडे पाहिले जात आहे.

यापूर्वी नेटीझन्सनी उत्तरप्रदेशमधील राजकीय वादंग देखील ‘दंगल’च्या स्वरुपातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. उत्तरप्रदेशचे  मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे चुलते शिवपाल यांच्यातील वादावर प्रतिक्रिया देताना ‘दंगल’च्या पोस्टरचा वापर करण्यात आल्याचे पहायला मिळाले होते.