Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत येत असतात. नुकताच त्यांचा बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राबरोबर साखरपुडा झाला. तेव्हापासून ते चांगलेच प्रकाशझोतात आले आहेत.
संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. येथेसुद्धा राघव चड्ढा यांची जोरदार चर्चा आहे. या अधिवेशनाच्या चर्चा सत्रात राघव चड्ढा यांनीसुद्धा हजेरी लावली होती आणि अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. पण, यादरम्यान त्यांच्याबरोबर एक मजेशीर घटना घडली. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
हेही वाचा : याला म्हणतात खरा सखा! शेतकरी खाली पडताच धावत आला बैल, व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा!
राघव चड्ढा संसद भवनाच्या परिसरात फिरत असताना फोनवर बोलत होते, तितक्यात एक कावळा तिथे आला आणि त्यांच्या डोक्यावर चोच मारून फरार झाला. ही घटना कॅमेरात कैद झाली. सध्या या घटनेच्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. हे फोटो सगळीकडे व्हायरल झाले असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.
राघव चड्ढा सर्वांत कमी वय असणारे राज्यसभेचे तरुण खासदार आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाद्वारे त्यांनी राजकारणात प्रवेश केला. गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेत्री परिणीती चोप्राबरोबरच्या त्यांच्या अफेअरमुळे ते चर्चेत होते. नुकताच त्यांचा परिणीतीबरोबर साखरपुडा पार पडला.