पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. ही घोषणा करणाऱ्या आम आदमी पक्षाने त्यांचा प्रचार आणि सेलिब्रेश करण्यासाठी एक अनोखा मार्ग शोधला. करणाऱ्या आम आदमी पक्षाने (AAP) शाहरुख खानच्या ‘मस्त कलंदर’ गाण्यावर भगवंत मान, अरविंद केजरीवाल, नवज्योतसिंग सिद्धू आणि चरणजीत सिंग चन्नी यांचा समावेश असलेला एक आनंददायक व्हिडीओ ट्विट केला आहे.
नक्की काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
व्हिडीओमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, प्रदेश काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांचे चेहरे गाण्यातील पात्रांच्या चेहऱ्यावर सुपरइम्पोज करण्यात आले आहेत. विद्या बालनचे पात्र मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत चित्रित करण्यात आले आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे दोन स्पष्ट इच्छुक उमेदवार एकमेकांना खाली खेचत असताना आप नेत्याला बहुमोल पद मिळत असल्याचे चित्रण करण्यासाठी काँग्रेसला फटकारण्याचाही या व्हिडीओचा उद्देश आहे. व्हिडीओमध्ये AAP नेते अरविंद केजरीवाल उत्सव साजरा करताना आणि काँग्रेस नेते राहुल गांधींचा चेहरा उदास दिसत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
(हे ही वाचा: सिंहाने पाणी पीत असलेल्या हरणावर केला हल्ला आणि…;बघा व्हायरल व्हिडीओ)
“पंजाबचा पुढचा मुख्यमंत्री इन द हाउस! #AAPdaCM,” AAP ने व्हिडीओ असलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हे बेबी चित्रपटातील ‘मस्त कलंदर’ गाण्यावर आधारित हा व्हिडीओ रिलीज झाल्यानंतर लगेचच व्हायरल झाला.
(हे ही वाचा: बोलण्याची संधी मिळाली नाही म्हणून ‘नाचू’ लागली महिला; लाइव्ह टीव्ही डिबेट दरम्यानचा Video Viral)
केजरीवाल यांनी मंगळवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात भगवंत मान यांची पंजाबमध्ये पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. पक्षाने ‘जनता चुनेगी अपना सीएम’ अभियान सुरू केले होते. काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही, पक्षाने काल एका व्हिडीओमध्ये चन्नी हे पक्षाचा मुख्यमंत्री चेहरा असल्याचे संकेत दिले होते.
(हे ही वाचा: Viral Video: थंडीपासून वाचण्यासाठीचा केलेला हा जुगाड पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही!)
पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत आप दुसऱ्या स्थानावर होती.