Aashadhi wari 2024 Video: आपण श्रावणबाळाची कथा ऐकलीच असेल. श्रावण आई-वडिलांना कावडीत बसवून कावड खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला निघाला होता. आजच्या काळात असा श्रावणबाळ पाहायला मिळणं फार कठीण आहे, हे आपण केवळ ऐकलेलं आहे. पण, आजचा आधुनिक श्रावण बाळ कसा असू शकतो किंवा कसा आहे, हे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघण्याचा अनुभव हा पांडुरंगाच्या वारीमध्ये अनुभवायला मिळाला आहे. अशी अनेक मुलं असतात जी आपल्या पालकांना अत्यंत जीवापाड जपतात. याच श्रावणबाळाची आठवण करून देणारी एक घटना समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलियुगातील श्रावणबाळ

सध्या महाराष्ट्रात पांडुरंगाच्या वारीचा सोहळा सुरू आहे, लाखोंच्या संख्येने वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. याचदरम्यान आपल्या आईला चालता येत नाहीये मात्र वारीही चुकवायची नाहीये, हे लक्षात आल्याने लेकानं आईला थेट खांद्यावर घेऊन पायी वारी केलीय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या श्रावणबाळाचं सर्वत्र कौतुक होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल कलियुगातील श्रावणबाळ.

आईला खांद्यावर घेऊन चढला दिवेघाट

पालखी प्रवासातील माऊलींच्या पालखीचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा दिवे घाट असतो. दिवे घाटातील अवघड चढण आणि वळण चढताना घाम फुटतो, मात्र हेच वारकरी अगदी सहज हा घाट पार करतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आईला दिवे घाट चढणं शक्य नव्हतं, त्यामुळे लेकानं आईला खांद्यावर घेतलं आहे. हा आजच्या युगातला श्रावण बाळ सध्या चांगलाच लोकप्रिय झाला असून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दरम्यान, दिवसाआड घरगुती भांडणांच्या घटना समोर येणाऱ्या आजच्या काळात अशी मुलं पाहायला मिळणं हे अत्यंत सुखद आहे. आज थकलेले आई-वडील अनेक तरुणांना घरात नको आहेत, त्यांना घरातून हकलून दिले जाते; तिथे हा श्रावणबाळ आई-वडिलांना अशा पद्धतीने यात्रा घडवून आणत आहे. नेटकऱ्यांनीही या मुलाचं कौतुक केलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नीरेत न्हाली; वारकऱ्यांचे डोळे पाणावले, पाहा नेत्रदीपक सोहळ्याचा उत्साही Video

हा व्हिडीओ सोशल मीडियावर paulvata_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी व्हिडीओला “आईला दिवे घाट चढणं शक्य नव्हतं म्हणून मुलाने आईला खांद्यावर उचलून घेतलं आणि संपूर्ण दिवे घाट चढून गेला. आज काल असं दृश्य दिसणं दुर्मीळ आहे, पण हे सर्व शक्य आहे पंढरीच्या वारीमध्ये” असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावर लाखो लाइक्स आणि प्रतिक्रिया लोकं देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aashadhi wari 2024 dive ghat todays shravan bal young man carries his elderly parents on his shoulder for wari video goes viral srk
Show comments