सहा तास कोणाला पुतळा बनून उभे राहिलेले पाहिले आहे का ? फारफार तर तासभर एखादा माणूस पुतळा बनून उभा राहिल पण सहा तास एका जागेवरून न हलता किंवा पापणीही न लवता उभा राहिलेल्या जीवंत पुतळ्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. चेन्नईच्या वीजीपी गोल्डन बिच रिसॉर्टवर अब्दुल हजीज हे जीवंत पुतळा म्हणून उभे राहतात. गेल्या ३१ वर्षांपासून ते हे काम करत आहे. त्यांची खासियत म्हणजे ते सहा तास न हलता आणि डोळ्याची पापणीही न लवता उभे राहतात. इतकेच नाही तर या रिसॉटला भेट देण्यासाठी येणा-या लोकांना या रिसॉर्टकडून एक आवाहन देण्यात आले. जो कोणी अब्दुल यांना जागेवरून हलवून दाखवेल त्यांना १० हजारांचे बक्षीस देण्याचे या रिसॉर्टने जाहिर केले पण आतापर्यंत एकालाही त्यांना हलवण्यात यश आले नाही. येथे भेट देणारा प्रत्येक जण अब्दुल यांच्या सोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करतो, अनेक जण त्यांना हसवण्याचा प्रयत्न करतात पण कोणालाही त्यात यश आले नाही. आपल्या या कमालीच्या ताकदीचे रहस्य पॉवर योगा असल्याचे अब्दुल सांगतात. रोज सकाळी उठून ते तासभर तरी योग साधना करतात.
VIRAL VIDEO : ‘या’ जीवंत पुतळ्याला हलवून दाखवा आणि जिंका १० हजारांचे बक्षीस
दररोज सहा तास जीवंत पुतळा म्हणून उभे राहतात
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 01-11-2016 at 16:01 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul haziz the living statue