सोशल मीडियावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधील थरारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण प्रवासादरम्यान या बसचा एक्सलेटर अचानाक तुटला शिवाय एक्सलेटर तुटल्यानंतर बसचालकाने दोरीच्या साह्याने बस चालवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे बसमधील प्रवाशी चांगलेच घाबरले होते.

खरं तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसची अवस्था बिकट आहे. त्यापैकी काही बस नादुरुस्त असतात. त्यामुळे कधी या बसचा टायर फुटतो तर कधी धावत्या बसच्या खिडक्या कोसळतात. अशा नादुरुस्त बसमुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. शिवाय महामंडळाच्या बसची किती वाईट परिस्थिती आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक्सलेटर तुटल्यामुळे ड्रायव्हर दोरीच्या साह्याने बस चालवत असल्याचं दिसत आहे.

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
mobile transport officer stolen Mumbai, mobile stolen Mumbai,
मुंबई : वाहनावरील कारवाई टाळण्यासाठी परिवहन अधिकाऱ्याचा मोबाइलच पळवला
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान
Two youths die while performing stunts on two wheelers after drinking alcohol
नागपूर : दारु पिऊन दुचाकीने ‘स्टंटबाजी’; दोन युवकांचा मृत्यू
Asangaon-Kasara local trips, local trains running late,
आसनगाव-कसारा लोकल फेऱ्यांमध्ये एक्सप्रेसचा अडथळा, लोकल गाड्या उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी
Accident on Eastern Expressway thane news
पूर्व द्रुतगती महामार्गावर अपघात; चालक जखमी

हेही पाहा- तरुणाने बाईकमध्ये पेट्रोलऐवजी दारु भरली अन्…, व्हायरल Video पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरुन हसाल

हेही पाहा- “कडक उन्हात आपुलकीचा गारवा…” उन्हापासून रिक्षाचालकाचा बचाव करण्यासाठी महिलेची धडपड; हृदयस्पर्शी फोटो Viral

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस कल्याण जवळच्या विठ्ठलवाडी आगारातून अमळनेरकडे जात असतानाचा अचानक एक्सलेटर पायडल तुटला. यानंतर ड्रायव्हरने स्टेअरिंग आणि कंडक्टरने एक्सलेटर सांभाळलं. धक्कादायक बाब म्हणजे एक्सलेटरला चक्क दोरी बांधून त्यांनी ही बस चालवल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत, ड्रायव्हर स्टेअरिंग पकडून बस चालवत आहे तर कंडक्टर एक्सलेटरला बांधलेली दोरी हातात पकडून उभा असल्याचं दिसत आहे

ड्रायव्हर आणि कंडक्टरचा हा अनोखा जुगाड पाहून बसमधील प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला होता. एका प्रवाशांने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी महामंडळाच्या कारभारावर टीका केली आहे. तर काही लोकांनी बस ड्रायव्हर आणि कंडक्टरने केलेल्या जुगाडाचं कौतुक केलं आहे.

Story img Loader