Accident Car Plunges from First Floor in Pune video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ पुण्यातून समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. मात्र हा अपघात कोणत्या रस्त्यावर झालेला नाहीये तर पार्किंगमध्ये झालाय. चालकानं पार्किंगमध्ये रिव्हर्स गिअर टाकला आणि होत्याचं नव्हतं झालं.
पुण्यात एका पार्किंगमध्ये विचित्र प्रकारचा अपघात घडला आहे. एक कार पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून थेट खाली कोसळली, याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण कारचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच कारमधील ड्रायव्हर देखील किरकोळ जखमी झाला असल्याचं बोललं जात आहे. या थरारक घटनेमध्ये नेमकी चुकी कोणाची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ही घटना पुण्यातील विमान नगर येथील शुभ अपार्टमेंटमध्ये घडली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही एक कार पाहू शकता. ही कार दुसऱ्या मजल्यावरची भिंत फोडून खाली पडताना दिसतेय. ही कार खाली पडली तेव्हा सुदैवानं आसपास कोणाही नव्हतं त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच सुदैवाने कारचा वेग जास्त नसल्यामुळे मोठा अनर्थ होण्यापासून टळला. कार खाली पडल्यानंतर गाडीतील लोक बाहेर पडले. या अपघातामध्ये सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. पण या प्रकरणामुळे लोकांमध्ये मात्र भितीचं वातावरण पसरलं आहे. ही संपूर्ण घटना सोसायटीच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात, ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. एकानं कमेंट केलीय की, “मृत्यू कुणालाच रोखता येत नाही” तर आणखी एकानं या सगळ्याचा दोष चालकाला दिला आहे.