Accident viral video : रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबाबत बोलायचं झालं, तर दरवर्षी येथे रस्ते अपघातांची संख्या वाढतच चाललीय. डोक्याला गंभीर दुखापत होऊन दरवर्षी शेकडो तरुणांना, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागतो. त्यामुळेच लोकांना हेल्मेट घालण्यासह सुरक्षा उपायांचं पालन करण्याचा सल्ला दिला जातो. असे अनेक व्हिडीओदेखील आहेत; ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. असाच एक गुजरातमधील अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे; जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अपघाताचा हा व्हिडीओ गुजरातमधल्या सुरत येथील रिंग रोड पुलावरील आहे. याच पुलावर हा अपघात घडला; मात्र सुदैवानं हेल्मेट घातल्यामुळे हा तरुण थोडक्यात बचावला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बाइकस्वार कारला ओव्हरटेक करतो आणि थेट रस्त्याच्या सुरक्षा भिंतीवर जाऊन आपटतो. त्यानं यावेळी जर हेल्मेट घातलं नसतं, तर हमखास त्याचा जागीच मृत्यू झाला असता. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, त्या सुरक्षा भिंतीला तरुणाचं हेल्मेट धडकतं आणि तो जागेवरच पडतो; अन्यथा तो पलीकडे खाली पडला असता. मात्र, काही क्षणांत तो उभा राहिला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> खासदार थिरकल्या! नवनीत राणा यांचा तुफान गरबा डान्स; VIDEO मुळे पुन्हा चर्चेत

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरनं लिहिलंय, ‘या यूं कहें कि उसका दिन अच्छा रहा’, तर दुसऱ्या युजरनं, ‘हेल्मेटनं जागीच मृत्यू रोखला’, अशी टिप्पणी केली.