Viral Video: बॉडी बिल्डर्स अनेकदा स्पर्धेमध्ये जड वजन उचलून किताब आपल्या नावे करतात. कधी-कधी अशा स्पर्धांदरम्यान अपघातही होत असतात. अनेकदा असे घडले आहे की जास्त वजन उचलण्याच्या नादात स्नायूंवर ताण येतो. याशिवाय असे व्हिडीओही अनेकदा व्हायरल झाले आहेत, ज्यात वजन उचलताना एखादी डंबेल किंवा जड वस्तू त्या व्यक्तीच्या अंगावर पडली, त्यामुळे त्यांची शरीरला मोठी दुखापत होते. असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्ट्राँग मॅन स्पर्धेदरम्यान एका व्यक्तीसोबत अपघात झाला आहे.
भला मोठा दगड उचलायला गेला अन्
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीच्या अंगावर भला मोठा दगड पडल्याचे दिसत आहे. वास्तविकता ही व्यक्ती बॉडी बिल्डर असल्याचे दिसते आणि एका स्पर्धेत तो एक जड दगड उचलून लोखंडापासून बनवलेल्या स्ट्रक्चरवर ठेवत आहे. हा जड दगड हा व्यक्ती हात-पायांच्या साहाय्याने उचलतो, पण त्याला लोखंडी संरचनेवर ठेवणार असतो इतक्यात मोठा अपघात घडतो. या व्यक्तीला त्या दगडाचे वजन सहन होत नाही आणि ती व्यक्ती दगड अंगावर घेऊन जमिनीवर पडते, त्यामुळे दगडाचा संपूर्ण भार त्या व्यक्तीच्या छातीवर येतो. यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात विचित्रपणे आखडते. या अपघातानंतर त्याचे डोके आणि दोन्ही पाय जमिनीवर सरळ होत नसल्याचे दिसते.
पीडितेच्या शरीराची हालचाल थांबली
या अपघातानंतर तेथे उपस्थित तज्ज्ञांनी येऊन परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. काहींनी पीडित व्यक्तीचा पाय सरळ करण्यास सुरुवात केली तर काहींनी त्याचे शरीर सरळ करण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकारानंतरही पीडितेच्या शरीरामध्ये कोणतीही हालचाल होत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत २ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.हा व्हिडीओ जुना असून सध्या पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
२१० किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात फिटनेस ट्रेनरने गमावला जीव
दरम्यान असाच काहीसा प्रकार इंडोनेशियातील फिटनेस इन्फ्लुअन्सबरोब देखील घडला आहे. ३३ वर्षीय जस्टिन विकीचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिममध्ये २१० किलो वजनाचा बारबेल उचलत असताना मानेला दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना १५ जुलै रोजी घडली आहे.