घरातील लहान मुलं कधी काय करतील हे सांगता येत नाही, त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्य त्यांच्यावर लक्ष ठेवून असतो. कारण या लहान मुलांना आपण काय खातो काय करतो याची माहिती नसते. त्यामुळे कधीकधी ते नको ते पदार्थ खातात किंवा काही इलेक्ट्रीक उपकरणाला हात लावतात जे त्यांच्यासाठी धोकादायक ठरु शकतं.
सध्या दिल्लीतून अशीच एक धक्कादायक दुर्घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एक दिड वर्षाचा मुलगा घरातील वॉशिंग मशीनमध्ये पडला होता. शिवाय तो १५ मिनिटांपर्यंत मशीनमधील साबणाच्या पाण्यातच पडून होता. ज्यावेळी त्याला बाहेर काढलं गेलं तेव्हा तो पूर्णपणे निळा पडला होता.
हेही वाचा- “ट्विटर वापरण्याचा आजचा शेवटचा दिवस” एलॉन मस्कने शेअर केलेला सेक्सी फोटो पाहून नेटकरी संतापले
सुदैवाची बाब म्हणजे तब्बल १२ दिवसांच्या अथक प्रयत्न केल्यानंतर डॉक्टरांनी या चिमुकल्याचे प्राण वाचवले. शिवाय मशीनध्ये खूप वेळ बुडल्यामुळे तो कोमात गेला होता. त्यामुळे त्याला १२ दिवसांपर्यंत व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. आता तो चिमुकला पूर्णपणे बरा झाला असून त्याला रुग्णालयातून घरी नेण्यात आलं आहे.
हेही वाचा- बाईकला अडकवलेल हेल्मेट घालताना अचानक आतून बाहेर आला साप अन्…, अंगावर शहारा आणणारा Video पाहाच
मुलावर उपचार करणाऱ्या फोर्टिस रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, तो मुलगा आता बरा झाला असून तो आरामात फिरत आहे. ते पुढे म्हणाले, या लहान मुलाला हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा तो बेशुद्ध होता. त्याचे शरीर कसलाही प्रतिसाद देत नव्हते आणि श्वासोच्छ्वासदेखील नीट चालत नव्हता. शिवाय तो पूर्णपणे निळा पडला होता, त्याच्या हृदयाचे ठोके तुटत होते आणि रक्तदाब जवळजवळ संपला होता.
खेळता खेळता पडला वॉशिंग मशीनमध्ये –
मुलाच्या आईने सांगितले की, त्यांचा मुलगा टॉप लोडिंग वॉशिंग मशीनमधील साबणाच्या पाण्यात १५ मिनिटापर्यंत पडून होता. शिवाय आई घरातून बाहेर गेली असता खुर्चीचा वापर करून तो मुलगा वॉशिंग मशीनवर चढण्याच्या प्रयत्त करत असताना ही दुर्घटना घडली. आई बाहेरून घरात आली तेव्हा मुलगा कुठेच दिसत नव्हता. अखेर त्यांना आपला मुलगा वॉशिंग मशीनमध्ये पडल्याचं दिसलं. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, तो १५ मिनिटांपेक्षा कमी पाण्यात बुडला असावा, अन्यथा त्याचा जीव वाचवणं कठीण झालं असतं
हेही पाहा- पिसाळलेल्या हत्तीने काही क्षणात पलटी केला टेम्पो; थरारक Video पाहून अंगावर येईल शहारा
साबणाच्या पाण्यामुळे मुलाच्या शरीरातील अनेक भाग खराब झाला होता. ज्यामुळे मुलाला न्यूमोनिया झाला होता. तर योग्यवेळी उपचार केल्याने मुलगा बचावला आहे. सुरुवातीला त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते पण जेव्हा तो त्याच्या आईला ओळखू लागला, तेव्हा त्याला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.