Accident video: सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. गाडी चालवताना नेहमी नियमांचं पालन करावं, अशा प्रकारच्या अनेकविध सूचना अनेकदा देऊनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात टाकतात. एक अपघात आपलं किंवा दुसऱ्याचं आयुष्य संपवू शकतो हेदेखील आजकाल कोणाला कळत नाही.
रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवताना काही जणांना आजूबाजूच्या गोष्टींचं भानच नसतं आणि हेच कारण अनेक अपघातांना पुरेसं ठरतं. सोशल मीडियावर अनेकदा अशा रस्ते अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. सध्या सोशल मीडियावर एका भयंकर अपघाताचा असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून अंगावर अक्षरश: काटा येईल. या अपघाताच्या घटनेत नेमकं घडलं काय? ते जाणून घेऊ…
देव तारी त्याला कोण मारी…
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस बस पकडण्यासाठी रस्त्याच्या दिशेने जाताना दिसतोय. रस्त्यावर पोहोचताच भरवेगात अजून एक बस येते आणि त्या दोन बसमध्ये तो माणूस चिरडून जातो. बस पुढे जाऊन थांबते आणि तो माणूस रस्त्यावर खाली पडतो. मग तो जीवाची धडपड करत कसाबसा आपला जीव वाचवतो.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ @chalapathichangala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर तब्बल २.१ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.
हेही वाचा… सासर असावं तर असं! भारतीय मुलाशी लग्न करून बदललं आयुष्य, अमेरिकन महिला VIDEO शेअर करत म्हणाली…
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “त्याचा परवाना रद्द करा.” तर दुसऱ्यानं “माफ करा, पण त्या माणसाबरोबर जे घडलं, ते पहिल्यांदाच घडत नाहीय.” अशी कमेंट केली. तर, एक जण कमेंट करीत म्हणाला, “गाडी चालवतोय की प्लेन”, तर एकानं “चालकाला तुरुंगात टाका”, अशी कमेंट केली.