पाऊस सुरू झाला की बाईकचालकांना मोठा मनस्ताप होतो. रस्त्यावर जिकडे तिकडे खड्ड्यात पावसाचं पाणी भरतं आणि मग रस्त्यावरून वाहन चालवताना अनेक अपघात घडतात. अनेकदा गटारीचे झाकण उघडेच राहते. पाणी तुंबल्याने खड्डे दिसत नसल्याने लोक त्यात पडतात. असाच एक व्हिडीओ लोकांना आश्चर्याचा धक्का देत आहे. हा व्हिडीओ पाहून हसू देखील येतं आणि नंतर भीती देखील वाटू लागते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधल्या अलीगढमधला आहे. पहिल्याच पावसाने अलीगढमधल्या रामघाट रस्त्यावरील किशनपूर येथील बाबा मार्केटसमोरील नाल्यात पाणी साचलं होतं. स्कुटी चालवणारा माणूस रस्त्याच्या कडेला पोहोचतो आणि गाडी पार्क करण्याचा विचार करतो. स्कुटी जिथे लावण्यासाठी नेत होता, तिथे मोठा खड्डा होता हे त्याला कळलं नाही. यानंतर तो पत्नीला बसवून स्कुटी पार्क करण्यासाठी नेताच त्याची स्कुटी पूर्णपणे पाण्याखाली जाते. स्कुटीसोबत हे दोघे पती-पत्नी देखील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडतात. 

हे दृश्य पाहणे खूपच भयावह आहे. सुदैवाने तेथे बरेच लोक उपस्थित होते, त्यामुळे त्यांनी ताबडतोब पती-पत्नीला खड्ड्यातून बाहेर काढले. तुम्हाला हे पाहून आश्चर्य वाटेल की खड्डा इतका खोल आहे की स्कुटीचा पत्ता देखील लागत नाही. ही सर्व थरारक घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच लगेचच व्हायरल झाला. 

आणखी वाचा : भारतीय कोब्राने गिळला ५ फूट लांबीचा रसेल वायपर साप, पाहा हा भयानक VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा :

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्हायरल व्हिडीओमधल्या पती-पत्नीचं नाव दयानंद सिंह अत्री आणि अंजू असं असून यातील दयानंद हे पोलीस कर्मचारी आहे. ते तपासणी करण्यासाठी डॉक्टरकडे जात होते. वाटेत पावसामुळे पाणी साचल्याने नाला दिसला नाही आणि ते दोघे स्कुटीसह खोल खड्ड्यात पडले. वृत्तानुसार, नाल्यात पडल्याने पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.

व्हिडीेओ पाहून सोशल मीडिया यूजर्स पावसाळ्यात लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देत आहेत. व्हिडीओ शेअर करून युजरने सांगितले की, अपघातातील पीडित युपी पोलिसांचा कर्मचारी आहे. व्हिडीओ पाहून लोक म्हणत आहेत की पावसाळ्यात सावधानता न बाळगल्यास एक छोटीशी चूक तुमचे मोठे नुकसान करू शकते.