Accident Viral Video: सोशल मीडियावर अपघाताचे व्हिड़ीओ नेहमी समोर येत असतात. भारतात आणि परदेशात अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. तुम्हीच पाहा या अपघातामध्ये नक्की चूक कुणाची ?
वाहतुकीच्या नियमांचं पालन होत नसल्याने अपघात होतात आणि त्यात जीव गमावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या व्हिडीओमध्ये चुकी दोन्ही बाजूने असल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये वाहन चालकांना वेग आणि समोरील वाहन चालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. सर्वसामान्यपणे वर्दळ होती. यावेळी रस्त्यावरुन एका स्कूटीवर महिला रस्त्यावर दिसत आहे, तेवढ्याच अचानक पाठीमागून दुसऱ्या स्कूटीवरुन दोन महिला येतात आणि पुढच्या स्कूटीवर असलेल्या महिलेला जोरदार धडक देतात. ही धडक इतकी भीषण होती की या तिन्ही महिल रस्त्यावर उडून पडतात.
या तिनही महिला रस्त्यावर वेगवेगळ्या दिशेला फेकल्या जातात. हा व्हिडीओ पाहून सर्व जण हैराण झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “मुलाला शेती पाहिजे; पण…” असं कसं चालेल म्हणत पुण्यात तरुणानं पोस्टरवर लिहला भन्नाट टोला; Photo पाहून पोट धरुन हसाल
सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. ramsinghyadav4472 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं कमेंट केली आहे की, चारही बाजूला लक्ष दिलं पाहिजे. तर दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये केलीय की, “यामध्ये यांच्या चुकांमुळे इतर लोकांचे निष्पाप बळी जातात”