Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.

कर्नाटक राज्यातील महामार्गवर एक भयंकर अपघात झाला आहे. गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरला धडकून अवघ्या १२ सेकंदात १५ वेळा उलटली जाते. यात तिघांचा मृत्यू झाला. महामार्गावरील संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. सध्या संपूर्ण थरराक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झालेला आहे.हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अचानक हायवेवर गाड्यांची वर्दळ सुरु आहे. यावेळी हायवेवर एक कार दुभाजकाला आदळते आणि भयानक अपघात होतो आणि यावेळी ही कार तब्बल १५ वेळा उलटली जाते. कार उलटली जात असताना त्या वाहनातून एक व्यक्ती हवेत उडाला जातो आणि जमिनीवर जोरदार पडतो. ही घटना इतकी भीषण असते की रस्त्याच्या बाजूला असलेले नागरिक तात्काळ त्यांची मदत करण्यासाठी धावून जातात. अवघ्या १२ सेंकंदात थरारक घटना घडली जाते.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. सोशल मीडियावर हा व्हिडीओ एक्सवरील @Madrassan_Pinky या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर यापूर्वीही अनेक धक्कादायक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालेले आहेत. “बापरे भयंकर शेवट” अशी प्रतिक्रिया दिली आहे तर आणखी एकानं, गाडी दुभाजकाला कशामुळे धडकली हे स्पष्ट नाही, आपल्याला विरुद्ध बाजूचा व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.