Accident Video: सोशल मीडियावर अनेकदा रस्ते अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो.
रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवताना काही जणांना आजूबाजूच्या गोष्टींचं भानच नसतं आणि हेच कारण अनेक अपघातांना पुरेसं ठरतं. सध्या सोशल मीडियावर एका अशाच अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका रिक्षाची आणि दुचाकीची धडक होते, यात नेमकी चूक कोणाची असते, ते पाहा…
भयंकर अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. यात एका रिक्षाची आणि दुचाकीची धडक होते आणि दुचाकवर बसलेले नवरा बायको खाली कोसळतात. चुकीच्या दिशेने वेगाने येणारा रिक्षाचालक आणि गाडी वाकडी तिकडी चालवत स्टंट करणारा दुचाकीस्वार दोघेही या अपघातासाठी जबाबदार असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
अपघात होताच दुचाकीवरून पडलेला माणूस लगेच उठतो आणि रिक्षाचालकाला मारायला लागतो. भररस्त्यात तो रिक्षाचालकाला जोरजोरात मारू लागतो. तेवढ्यात तिथे गर्दी जमा होते आणि लोकं त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @tracker_with_love या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “यामध्ये चूक कोणाची ते सांगा” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल मिलियन व्ह्यूज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “रिक्षावाला चुकीचा आहेच पण बाईक वाला स्टंट करतोय पाहा…” तर दुसऱ्याने “व्हिडीओ काढणाऱ्याची” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “दोघांचीही चूक आहे”