Accident Video: सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. गाडी चालवताना नेहमी नियमांचं पालन करावं, हेल्मेट घालावं, फोनचा वापर करू नये, अशा सुरक्षिततेच्या सूचना अनेकदा देऊनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात.
एक अपघात आपल्याबरोबरच दुसऱ्याचं आयुष्यदेखील संपवू शकतो, हेदेखील आजकाल अनेकांना कळत नाही. यात कोणाचं नशीब चांगलं असेल तर तो वाचतो, नाहीतर असे भयंकर अपघात अनेकांचे जीवच घेतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात दोन दुचाकींचा खूप मोठा अपघात झाला. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ या…
भयंकर अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक दुचाकीस्वार भरधाव वेगात येतो आणि तो समोरून येणाऱ्या बाइकला जोरदार धडक देतो. धडक दिल्याने दोन्ही बाईकस्वार तिथेच कोसळतात. या अपघातात दोघांच्या गाडीचा चक्काचूर झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय. तसंच या अपघातादरम्यान एक महिला दुचाकीचालकही तिथे हजर असते, पण नशिबाने या अपघातापासून ती बचावते.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @thenagarinews या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “तेज रफ्तार को किसी की जिंदगी की कोई परवाह नहीं है” (वेगाला कोणाच्याही जीवाची पर्वा नसते) अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.२ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “जो वेगात गाडी चालवत होता त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे”, तर दुसऱ्याने “कृपया गाडी हळू चालवा” अशी कमेंट केली; तर एक जण कमेंट करत म्हणाला “ती मुलगी वाचली नशीब.”