Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात. तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये चुकी दोन्ही बाजूने असल्याचे समोर आले आहे. ज्यामध्य वाहन चालकाना वेग आणि समोरील वाहन चालकाचा हलगर्जीपणा कारणी भूत ठरला आहे. एक तरुण सायकलवरून जात होता. तेव्हा तो एका कारच्या दरवाजाला धडकला. त्यानंतर एका चालत्या ट्रकखाली गेला. संपूर्ण ट्रक त्या तरुणाच्या अंगावरून गेला. पण  थोड्या वेळाने तुम्ही पुढे पाहाल तर ट्रकखालून कुणीतरी बाहेर येताना दिसते. ट्रकच्या पुढच्या भागाकडून. तुम्ही नीट पाहिलं तर हा तोच तरुण आहे, जो अपघातानंतर या ट्रकखाली गेला. तरुणाला काहीच झालं नाही आहे. तो सुखरूप आहे. सुदैवाने तो ट्रकच्या मधोमध होतो. चाकं त्याच्यावरून गेली नाही. त्यामुळेच त्याचा जीव बचावला

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ८० वर्षांपूर्वीची पाचवीची प्रश्नपत्रिका व्हायरल; प्रश्न वाचून भल्याभल्यांना फुटला घाम

@cctvidiots नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident video viral man comes under truck after crashing with car door srk
Show comments