महामार्गावर वाहन चालकाच्या चुकीमुळे किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे बरेच अपघात होतात. अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बहुतेक अपघात हे वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याने होतात. भरधाव गाड्या चावलणं, नको ते जीवघेणे स्टंट करणं, विरुद्ध मार्गाने गाड्या चालवणं अशी अपघाताची एक ना दोन तर किती तरी कारणे आहेत. अशा दुर्घटनांमध्ये विनाकारण निष्पाप जीवांना प्राण गमावावे लागतात. तर कधी नशिब बलवत्तर म्हणून काहीजण या संकटातूनही सुखरूप वाचतात. अशाच एका अपघाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कारचा भीषण अपघात झाल्याचे दिसत आहे. अपघात इतक्या वेगाने झाला की कारचे सर्व भाग वेगळे झाले. एवढेच नाही तर कारलाही आग लागली. दूरवरून भरधाव वेगाने येणारी एक कार थेट टोल बुथवर धडकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर कारने पेट घेतला. या कारमधील चालकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. टोल बुथला धडकल्यानंतर कार हवेत उडी मारून दुसऱ्या लेनमध्ये उलटली. हा अपघात इतका वेगवान होता की कारचा स्फोट होऊन आग लागली.अपघाताचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – वाघाने घातली बैलावर झडप, अक्षरश: फाडून खाल्लं, शिकारीचा Video पाहून येईल अंगावर काटा

भारतातही अपघात टाळण्यासाठी सरकार आणि अनेक संस्थांच्या वतीने मोहीम राबवून जनजागृती केली जाते. आपल्या देशातही रस्ते अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी लोकांनी जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे. नेटकरीही व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident viral video car crashed tollbooth burst flame purranque city chile accident video viral on social media srk