Accident Viral Video : देशात रस्ते अपघात सातत्याने होत आहेत. दिवसेंदिवस अशा अपघातांचे प्रमाण वाढत आहे, ज्यामुळे रोज शेकडो जणांना आपला जीव गमावावा लागतोय. विशेषत: भारतात बाईक अपघातांचे प्रमाण अधिक आहे. यात हेल्मेट न घातल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेक तरुण मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे लोकांना वेळोवेळी हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला जातो, कारण आजवर अशा अनेक अपघातांचे व्हिडीओ पाहिले गेलेत, ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. मुंबईतील असाच एका अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तु्मच्या काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रस्ते अपघात हे नेहमीच चालकाच्या चुकीमुळे घडतात असे नाही, अनेकदा या अपघातांमध्ये समोरच्या चालकाची चुकी असते, तर काही वेळा नैसर्गिक आपत्तीदेखील यासाठी कारणीभूत असतात; ज्यामुळे सर्व वाहतूक नियम पाळूनही चुकी नसतानाही चालकाला मनस्ताप सहन करावा लागतो. अशाच एका अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Read More Trending Video : “हरवलेले कानातले नाही; पण चांगली माणसं भेटली” तरुणीने शेअर केला हृदयस्पर्शी अनुभव, VIDEO पोस्ट करीत म्हणाली…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण स्कुटीने रस्त्यावरून जात होता. यावेळी तिथे मुसळधार पाऊस आणि खूप वारा सुटला होता. याचवेळी रस्त्याच्या बाजूने लावलेला एक लोखंडी पत्रा वाऱ्यामुळे निखळला आणि थेट तरुणाच्या डोक्यावर जाऊन आदळला. सुदैवाने हेल्मेटमुळे तरुण बचावतो. हेल्मेट नसते तर तरुणाच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली असती किंवा जीवही गमवावा लागू शकला असता. व्हि़डीओमध्ये पाहू शकता, पत्रा उडून त्याच्या हेल्मेटवर आदळतो आणि खाली पडतो. यावेळी तरुण कसा तरी आपला तोल सांभाळून स्कुटी घेऊन पुढे जातो.

पत्रा उडून हेल्मेटवर आदळला अन्

तरुणाची चूक नसतानाही त्याला गाडी चालवताना अशा घटनेचा सामना करावा लागला, पण हेल्मेटमुळे तो बचावला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाहा समजेल की, गाडी चालवताना चालकाला किती सतर्क राहावे लागते.

सोशल मीडियावर the_burgman_diaries नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘हेल्मेट हेच बाईकस्वारांचे सुरक्षा कवच आहे’, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, आता समजलं हेल्मेटचे महत्व, आता रोज बाईक चालवताना हेल्मेट घालणार’, तर काहींनी तरुणाला त्याने कोणत्या कंपनीचे हेल्मेट घातले होतेस असा प्रश्न विचारला आहे.