Shocking video viral: रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबाबत बोलायचं झालं तर दरवर्षी इथं रस्ते अपघातांची संख्या वाढतच चाललीय. डोक्याला गंभीर दुखापत होऊन दरवर्षी शेकडो तरुणांना, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागतो. यामुळेच लोकांना हेल्मेट घालण्यासह सुरक्षा उपायांचं पालन करण्याचा सल्ला दिला जातो. असे अनेक व्हिडिओदेखील आहेत, ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरवर्षी रस्ते अपघातांची संख्या वाढतच चाललीय. डोक्याला गंभीर दुखापत होऊन दरवर्षी शेकडो तरुणांना, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागतो. त्यामुळेच लोकांना हेल्मेट घालण्यासह सुरक्षा उपायांचं पालन करण्याचा सल्ला दिला जातो. असे अनेक व्हिडीओदेखील आहेत; ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. असाच काही तरुणांचा अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही तरुण रस्त्यावर रेसिंग करताना दिसत आहेत. यावेळी एक बाईकचालक सायकलस्वाराला धडकतो. त्यानंतर तो स्वत: पुढे घसरत जातो आणि बाईकखाली त्याचं डोकं अडकतं, मात्र हेल्मेटमुळे तरुण बचावतो. बाईकचं इतकं वजन आहे की, हेल्मेट नसतं तर तरुणाचा जागीच जीव गेला असता.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नागमोडी वळणाचा रस्ता आहे, दोन मुले बाईक चालवतायत. एक जण पुढे आणि एक जण मागे आहे. यावेळी इतक्या वळणावळणाच्या रस्त्यावरही हा तरुण अतिशय वेगाने बाईक चालवतोय.

हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर maharashtra_trending_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलं, की ‘लगता है हेलमेट की गुणवत्ता का प्रचार कर रहे हैं.. या यूं कहें कि उसका दिन अच्छा रहा’, तर दुसऱ्या यूझरनं ‘हेल्मेटनं जागीच मृत्यू रोखला’, अशी टिप्पणी केली.

हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident viral video drivers life saved because of helmet video goes viral srk