सोशल मीडियावर दरदिवशी विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून अनेक जण आश्चर्यचकित होतात, तर काहींना हसू आवरत नाही. यापूर्वी सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यात रस्त्यावर अपघात होताना दिसत आहेत. अपघाताचे व्हिडीओ पाहून अनेकवेळा चिंता व्यक्त केली जाते. मात्र, सोशल मीडियावर अपघाताचा एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहून नेटकरी चिंता व्यक्त करत नसून खिल्ली उडवत आहेत.

अनेकदा अशा व्हिडीओंमध्ये महिला विचित्र पद्धतीने वाहने चालवताना दिसल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडिया युजर्स त्यांना पापा की परी म्हणतात. आता या व्हिडीओमध्ये मुलीचा कारनामा पाहून नेटिझन्सना हसू अनावर झालं आहे. मुलींच्या ड्रायव्हिंग कौशल्यावर सोशल मीडियावर अनेकदा विनोद केले जातात. असे काही व्हिडीओ नेहमीच व्हायरल होतात, ज्यामुळे लोक मुलींच्या ड्रायव्हिंग कौशल्यावर कमेंट करू लागतात. नुकताच पुन्हा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत की, “दरवेळेप्रमाणे या वेळीही दीदींनी ब्रेक लावला नाही.”

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पेट्रोल पंपावर काही वाहने इंधन भरण्यासाठी उभी असल्याचे दिसत आहे. पेट्रोल पंपावरील एक कर्मचारी महिलेच्या स्कुटीमध्ये पेट्रोल भरताना दिसत आहे. तर याच वेळी मागेहून एक मुलगी तिची स्कुटी घेऊन मागे रांगेत उभी असते. त्या महिलेच्या गाडीत पेट्रोल भरल्यानंतर कर्मचारी स्कुटीपासून थोडा दूर होतो. पण त्याचवेळी मागे असलेली ही मुलगी स्कुटी पुढे घेताना अचानक तिच्याकडून एक्सलेटर दाबला जातो. स्कुटी तिच्या नियंत्रणाबाहेर जाते आणि ती थेट कर्मचाऱ्याला जोरात धडक देते. तर दुसरीकडे गाडीत आधीच इंधन भरणारी महिलेलाही धक्का लागतो आणि ती स्कुटीवरुन खाली पडते.

(हे ही वाचा : VIDEO: वाघ अन् दोन बकऱ्यांचा झाला आमना-सामना, पुढे जे झालं त्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही)

येथे पाहा व्हिडिओ

लोकांच्या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स

आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ रितेश पाल नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. वृत्त लिहिपर्यंत या व्हिडीओला सात लाख व्ह्यूज आणि दोन हजार लाइक्स मिळाले आहेत. त्याच वेळी, व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी खूप मनोरंजक कमेंट्स केल्या आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले, “यात दीदींची चूक नाही, स्कुटी बनवणाऱ्यांची चूक आहे.” दुसऱ्याने लिहिले, “मुलींचे ब्रेकशी काय वैर आहे माहीत नाही.” अशाप्रकारे या व्हिडीओवर अनेक नेटकरी मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत.