हिंदी चित्रपटांमध्ये कथानकासोबतच आणखी एक महत्त्वाटी गोष्ट असते ती म्हणजे चित्रपटातील गाणी. संगीतासाठी ओळखल्या जाणाऱ्या या बॉलिवूडमध्ये चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणून काही चित्रपटांचा आणि कलाकारांचा आवर्जून उल्लेख केला जातो. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेते देव आनंद. देव आनंद यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची जितकी पसंती मिळाली तितकीच त्यांच्या चित्रपटातील सुमधूर गीतांनी असंख्य भावनानांना वाट मोकळी करुन देण्यास मदत केली. त्यांच्या अशाच एका सदाबहार गाण्याला सध्या एक अनोखा टच देण्यात आला आहे.

सहसा जुन्या गाण्यांना नव्या अंदाजात सादर करण्याचा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळतोय. या ट्रेंडला संगीतप्रेमींनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचेही पाहायला मिळतेय. अशाच या अफलातून दुनियेत सध्या तीन मध्यमवयीन महिला चर्चेत आल्या आहेत. देव आनंद यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या ‘है अपना दिल तो आवारा’ गाण्याचे सतार व्हर्जन या महिलांनी सादर केले आहे.

‘मंक’चा प्याला प्यायलेल्या संजय मिश्राला पाहिलात का?

सतार, गिटार आणि मडक्याच्या साथीने या गाण्याचे श्रवणीय व्हर्जन अंकुर श्रीवास्तवने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केल्यानंतर त्याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. ‘कोक स्टूडिओ’ आणि ‘अनप्लग्ड कॉन्सर्ट’च्या या दिवसांमध्ये ठेवणीतलं आणि सर्वांच्याच हृदयाचा ठाव घेणारं असं एखादं गाणं नव्या अंदाजात सादर झाल्यावर होणारा आनंद सोशल मीडियावर अनेकांनीच व्यक्त केला आहे.

Story img Loader