अनेकजण आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला फॉलो करतात. केसांची हेअर स्टाईल, हातातील घड्याळ, कपड्यापासून ते चालण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट त्या सेलिब्रिटीसारखीच असावी यासाठी अनेक प्रयत्न करतात. अशाचप्रकारे सेलिब्रिटीप्रमाणे दिसण्याच्या नादात एका २२ वर्षीय कॅनेडियन अभिनेता सेंट वॉन कोलुसी याने आपला जीव गमावला आहे. कोलुसीने प्रसिद्ध BTS गायक जिमीन (पार्क जी-मिन)सारखे दिसण्यासाठी सुमारे डभनभर शस्त्रक्रिया केल्या होत्या, पण या शस्त्रक्रियेने त्याच्यावर उलटे परिणाम झाले आणि त्याची प्रकृती आणखीनच बिघडत केली. यानंतर रुग्णालयात दाखल होताच त्याचा मृत्यू झाला.

डेली मेलच्या वृत्तानुसार, कोलुसीने जबड्यापासून नाक, भुवया, ओठ, चेहऱ्यापर्यंत दक्षिण कोरियातील गायक जिमीसारखा दिसण्यासाठी शस्त्रक्रिया केल्या, एकूण १२ शस्त्रक्रिया त्याच्यावर झाल्या आणि त्यासाठी १ कोटी ८० लाखांपेक्षा जास्त खर्चही झाला.

Cancer Radiation Chemotherapy Cancer Free Life Vandana Atre
कर्करोगाला रामराम ठोकताना…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
celebrity masterchef highest earning contestant tejasswi nikki tamboli usha Nadkarni
‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’साठी तेजस्वी प्रकाश घेते सर्वाधिक मानधन; तर निक्की तांबोळी, उषा नाडकर्णींना मिळतात ‘इतके’ पैसे
How is the number of Guillain Barré syndrome patients increasing in the Maharashtra state print exp
राज्यात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या रुग्णांमध्ये वाढ कशी? धोका किती? उपचार महागडा का?
Fill vacant posts of doctors in health department immediately says Health Minister Prakash Abitkar
आरोग्य विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरा- आरोग्यमंत्री
Mamta Kulkarni net worth
५२ व्या वर्षी संन्यास घेणाऱ्या मराठमोळ्या ममता कुलकर्णीची संपत्ती किती? वाचा…
Role of government in public health
आरोग्य व्यवस्था ही सरकारचीच जबाबदारी! 
Success Story sahil pandita
Success Story : एकेकाळी ५,२०० च्या पगारासाठी बाथरूम स्वच्छतेसह घासली भांडी; पण आता स्वबळावर उभी केली करोडोंची कंपनी

पण काही महिन्यांनी या कॉस्मेटिक सर्जरीच्या उलट परिणाम दिसू लागले. यात विशेषत: जबड्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्याची प्रकृती आणखी बिघडली. कोलुसीने गेल्या नोव्हेंबरमध्ये आपला जबडा प्रत्यारोपित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याला गेल्या शनिवारी रात्री त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे त्याच्या जबड्यावर शस्त्रक्रिया झालाी. पण दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे रविवारी कोलुसीचा मृत्यू झाला. शरीरात संसर्ग पसरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले पण तरीही डॉक्टर त्याचे प्रमाण वाचवू शकले नाहीत.

कोलुसीच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कोलुसीचा सहकारी एरिक ब्लेक याने म्हटले की, कोलुसीने काही महिन्यांपूर्वी केलेल्या कॉस्मेटिक सर्जरीमुळे त्याच्या शारीरिक प्रक्रियेत गुंतागुंत झाला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला,

एरिकने पुढे म्हटले की, जबडा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किती धोकादायक असते हे त्याला माहित होते, तरीही त्याने ती करुन घेतली. तो आपल्या लुकबद्दल खूप संवेदनशील होता, कोलुसी अभिनेता होण्याची स्वप्न घेऊ २०१९ मध्ये दक्षिण कोरियामध्ये आला. जिथे त्याने अनेक नाटक, मालिकांमध्ये काम केले. पण शस्त्रक्रियेनंतर शरीरात गुंतागुंत निर्माण होते हे माहित असूनही काही जण चांगले दिसण्यासाठी कॉस्मेटिक शस्त्रक्रियेचाच मार्ग निवडतात.

Story img Loader