वडील आणि लेकीचं नातं खूप खास असते. वडील आणि लेकीच्या नात्यातील प्रेम दर्शवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यापैकी काही खूप ह्रदयस्पर्शी असतात. काही पोस्ट पाहून लोक भावूक होतात तर काही वेळा खळखळून हसतात. सध्या अशाच एका वडील आणि लेक यांच्यातील व्हॉटस्अॅप चॅटचा स्क्रिन शॉट सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. दोघांमधील संवाद फार मजेशीर आहे जो वाचून लोकांना हसू आवरत नाहीये. व्हायरल स्क्रिनशॉटमध्ये वडिलांनी लेकीला मजेत टोमणा मारला आहे जो वाचून तुम्हाला खूप हसू येईल.

वडिलांनीच लेकीला केलं ट्रोल

इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. काही पोस्ट इतक्या मजेशीर असतात की आपल्या खळखळून हसायला भाग पाडतात. नुकतेच एक्सवर अन्वी नावाच्या मुलीने तिचे चॅटता स्क्रिनशॉट शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या वडिलांना काय झाले आहे.” .त्याचे झाले असे की, चॅटमध्ये वडिलांनी त्यांच्या लेकीला चुकीचे इंग्रजी बोलण्यावरून ट्रोल केले आहे. व्हायरल चॅटमध्ये पाहू शकता की वडील आपल्या मुलीला मेसेज करतात की,”40k Deposited in your account (तुझ्या खात्यामध्ये ४० हजार रुपये जमा केले आहेत).” वडिलांच्या मेसेज उत्तर देताना मुलगी लिहिते, “Found”(सापडले). हेच ऐकून वडिलांना राहवतं नाही आणि ते आपल्या मुलीचे चुकीचे इंग्रजी सुधारतात,”Received(मिळाले)” आणि मस्करीमध्ये पुढे म्हणतात की, “इंग्लिश मीडियममध्ये पैसे वाया गेले माझे.” इंग्रजी मिडीयमध्ये शिकूनही आपली लेक चुकीचे इंग्रजी बोलत आहे हे पाहून वडिलांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर वडिलांची ही प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. लोक पोस्टवर मजेशीर कमेंट करत आहे.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Abhishek Gaonkar and Sonalee Gurav
“माझ्या वडिलांचा विरोध…”, सोनाली अन् अभिषेक गावकरने सांगितला लव्ह स्टोरीचा रंजक किस्सा
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”

हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी भेट दिलेल्या लक्षद्वीपला कसे पोहचायचे? केव्हा द्यावी भेट? प्रवासासाठी किती येईल खर्च?

हेही वाचा – “मी दिव्यांग आहे पण…” कामगाराचा संघर्ष पाहून मिळेल जगण्याची प्रेरणा! नेटकरी म्हणाले, “बेरोजगारांनी हा Video एकदा बघाच!”

नुकताच वडील आणि लेकीच्या चॅटचा स्क्रिनशॉट लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशळ मीडियावर एक्स (ट्विटर)वर whyanviwhy नावाच्या अकांउटवर हा मजेशीर स्क्रिन शॉट पोस्ट केला आहे. आतापर्यंत १९ हजारपेक्षा जास्त लोकांनी या पोस्टला पंसती दर्शवली आहे. व्हायरल चॅट पाहून लक्षात येते की वडील आपल्या मुलीचे इंग्रजी सुधारण्या प्रयत्न करत आहे. त्यासह तिला मजेशीर टोमणा मारत ट्रोलही करत आहे. व्हायरल पोस्टवर एकाने लिहिले की, “तुझे वडील खूपच मजेशीर आहेत.” दुसऱ्याने लिहिले की, काका सर्वात मजेशीर आहेत. तिसरा म्हणाला, “वडिलांना फारचं दुख झालेले दिसते. तुझ्या शाळेत खूप जास्त फी भरली आहे वाटते.”

Story img Loader