द्वितीय महायुद्धाच्या काळात ज्या टेलिफोनवरुन लाखो जणांना मारण्याचे आदेश अॅडॉल्फ हिटलरने दिले होते, तो टेलिफोन लिलावासाठी ठेवण्यात येणार आहे. लाल रंगाच्या या फोनची बोली १,००,००० डॉलर (६७ लाख रु) पासून सुरू होणार आहे. काळ्या बेकलाइट फोनला लाल रंग देण्यात आला होता आणि त्यावर नाझी पार्टीचे प्रतीक काढण्यात आले होते. अलेक्झांडर हिस्टोरिकल ऑक्शन्स या कंपनीने या फोनची किंमत २,००,००० ते ३,००,००० डॉलरपर्यंत जाईल असे सांगितले आहे. ज्यावेळी हिटलरने आत्महत्या केली , त्यावेळी हा फोन बंकरमध्ये होता. रशियन फौजांनी हा फोन आपल्याकडे घेतला आणि त्यांनी ब्रिटीश ब्रिगेडियर राल्फ रेनर यांच्याकडे सोपवला. या फोनची मालकी रेनर यांच्याकडे होती. रेनर यांच्या मुलाने हा फोन विकण्याचे ठरवले आहे. अलेक्झांडर हिस्टोरिकल ऑक्शन्स या कंपनीतर्फे या फोनचा लिलाव करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा