Aadhar Card Photo Little girl: देशात सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डची गरज लागते. बँकेत खाते उघडायचे असेल, शेअर बाजारात डिमॅट खाते उघडायचे असेल, शाळेत मुलांचा प्रवेश याच नाही तर अनेक ठिकाणी आधार कार्ड हा दस्तावेज मागितल्या जातो. प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता असते. आधारकार्डवर आपला फोटो असणेदेखाल तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी आधारकार्ड केंद्रावर जाऊन फोटो काढावा लागतो. आधार कार्डवरील फोटो पाहिले तर अनेकदा आपल्या स्वत:चा फोटोदेखील आपल्याला ओळखता येत नाही. सुरुवातीला आधारकार्ड जेव्हा आले त्यावेळी अनेकांसाठी तो कौतुकाचा विषय होता. आधार केंद्रावर काढलेले फोटो अनेकांसाठी विनोदाचा विषय बनतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एखादी व्यक्ती आधार कार्डवर दिसते तितकी कुरूप नसते आणि सोशल मीडियावर दिसते तितकी हुशार नसते असे म्हणतात. भारतात असे लोक मोठ्या संख्येने आहेत जे त्यांच्या ओळखपत्रावरील फोटोवर खूश नाहीत. अनेकांना फोटोमुळे ओळखपत्र दाखवायलाही आवडत नाही. दरम्यान, आधार कार्ड बनवण्यासाठी आलेल्या एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल आणि तुम्ही तिच्या प्रेमात पडाल.

एक लहान मुलगी तिच्या पालकांसह आधार कार्ड केंद्रावर पोहोचली आहे. सर्व स्टेप्स केल्यानंतर जेव्हा फोटो क्लिक करण्याची वेळ आली तेव्हा मुलीने वेगवेगळ्या प्रकारची पोझ द्यायला सुरुवात केली. चेहऱ्यावर एक गोंडस हास्य होतं. हे पाहून उपस्थित लोकांचे हसू आवरले नाही. ती चिमुकली कॅमेऱ्याकडे बघून अनेक पोझ देताना दिसत आहे. कधी गालावर बोट ठेवून तर कधी डोळे मिचकत तिचे गोंडस हास्य पाहून नेटकरी घायाळ होत आहेत. हा व्हिडीओ एका आधार सेंटरचा आहे. कोणीतरी तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

(हे ही वाचा : टीम इंडियाच्या स्वागतासाठी उसळलेला जनसागर पाहून आनंद महिंद्रांनी मरीन ड्राईव्हला दिले नवे नाव; सूर्यकुमार म्हणाला, “तुम्ही…”)

गोंडस मुलीचा व्हिडिओ व्हायरल

मुलीचा हा क्यूट व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया यूजर्स मुलीचे कौतुक करत आहेत. या मुलीने अनेकांची मने जिंकली आहेत. हा व्हिडिओ @Pinkvilla ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जो वृत्त लिहिपर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी मुलीच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, “या मुलीचे हसणे पाहून मला आनंद झाला.” दुसऱ्याने लिहिले की, “बऱ्याच दिवसांनी मला इंटरनेटवर काहीतरी सकारात्मक पाहायला मिळाले.” एकाने लिहिले की, “हे पार्ले जी गर्लच्या अपडेटेड व्हर्जनसारखे दिसते.” एकाने लिहिले की, “ही मुलगी खूप गोंडस आहे. दुसऱ्याने लिहिले की, “ही मुलगी इतकी गोंडस आहे की तिच्याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही.”, अशा प्रकारच्या गोड प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.