इंस्टाग्राम आणि फेसबूक रिल्स, युट्यूब शॉट्स आजकाल खूप प्रसिद्धी मिळाली आहे. अवघ्या ९० सेंकदाचे हे व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रिल्स आणि शॉट्ससाठी ९० सेकांदाचे व्हिडिओ तयार करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक लोक प्रसिद्धीसाठी विचित्र गोष्टी करताना दिसतात. पण अशा व्हिडीओमध्ये अगदी मोजके व्हिडिओ असतात जे लोकांचे मन जिंकतात. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये नेपाळी गाण्यावर एका चिमुकलीने गोंडस डान्स केला आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चिमुकलीने आपल्या डान्सने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.
व्हिडीओमध्ये एका लहान मुलगी आपल्या वर्गमिंत्राबरोबर एका नेपाळी गाण्यावर नाचताना दिसत आहे. सर्वजण शांतपणे नेपाळी गाणे म्हणत आहे. टाळ्या वाजवत आहे पण चिमुकली मात्र बिनधास्तपणे नाचत आहे. नाचताना तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. विशेष म्हणजे गाण्याचे बोल ती अचूकपणे गात आहे. चिमुकली नाचताना आनंद घेत आहे हे स्पष्टपणे दिसते आहे.
येथे व्हिडिओ पहा:
बोक्सी को घर या नवीन नेपाळी चित्रपटातील बुझिना मैले या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. चिमुकलीने गाण्याचे स्टेप अगदी अचूकपणे केले आहेत. व्हिडीओमध्ये चिमुकलीने अप्रतिम डान्स केला आहे. हा व्हिडिओ खरचं मनमोहक आहे जो सर्वांना प्रचंड आवडला आहे.
इंस्टाग्रामवर ‘tiktoknepalofficial’ नावाच्या अकाऊंटद्वारे पोस्ट केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी कमेट करत या चिमुकलीचे कौतूक केले आहे.
“ती एक जन्मजात कलाकार आहे आणि एक दिवस एक उत्तम नृत्यांगना होईल,” असे मत अनेक दर्शकांनी व्यक्त केले. अनेकांनी सांगितले की ते हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहे. एकाने लिहिले,”ती चिमुकली स्वत:च्या विश्वात रमलेली आहे. दुसऱ्याने लिहिले की, “तिचे हावभाव बघा. तिच्याकडे कोणीही बघत नाही असा बिनधास्तपणे डान्स करत आहे ती”