तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अफगाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालिबान्यांपासून आपल्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी अफगाणी नागरिक प्रयत्न करत आहेत. अशातच सोशल मीडियावर हृदय पिळवटून टाकणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक अफगाणी महिला आपल्या लेकराला सुखरुप ठेवण्यासाठी अमेरिकन सैन्याकडे सोपावत असल्याचे दिसत होते. आता अमेरिकन सैन्याने ते बाळ पुन्हा त्याच्या वडीलांकडे सोपावल्याचे समोर आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओशी संबंधी अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. ‘काबूल विमानतळावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अमेरिकी लष्कराच्या अधिकाऱ्याने एका अफगाणी बाळाला तारेच्या कुंपनावरुन घेतले होते. आता त्या बाळाला त्याच्या वडिलांकडे पुन्हा सोपावण्यात आले आहे असून ते विमानतळावर सुरक्षित आहे’ अशी माहिती अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Video: हृदय पिळवटून टाकणारा अफगाणी महिलेचा व्हिडीओ, तान्ह्या बाळाला त्या आईने…
The Afghan baby who was seen on video being lifted up to a US Marine on the wall at Hamid Karzai International Airport (in Kabul) has been reunited with its father and “is safe at the airport,” according to the United States Marine Corps officials
— ANI (@ANI) August 20, 2021
अफगाणिस्तानातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. विशेष करून महिला वर्गामध्ये दहशत पसरली आहे. अनेक अफगाणी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानमधील दाहकतेचे वास्तव पाहून कुणाच्याही काळजाला तडे जातील.
#Afghanistan : Desperate Mother hands over her child to U.S. soilder above #kabulairport wall, in a hope he/she is saved from Talban pic.twitter.com/aDV2AcOEMf
— Megh Updates (@MeghUpdates) August 19, 2021
काय होता व्हिडीओ?
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा काबूल विमानतळावरील आहे. या व्हिडीओमध्ये एका अफगाणी महिलेने स्वत:च्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी जे काही केले आहे ते पाहून डोळ्यातून अश्रू येतील. या मातेने आपल्या बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी तान्ह्या बाळाला अमेरिकन सैनिकांकडे सोपवले आहे. अमेरिकन सैनिक तारेच्या कुंपणावरुन त्या बाळाला त्यांच्याकडे घेत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. अक्षरश: हृदय पिळवटून टाकणारा हा काबूल विमानतळावरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता त्या बाळाला अमेरिकन सैन्याकडून पुन्हा त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात आले आहे.