Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये शनिवारी आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे आतापर्यंत २००० हून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे; तर हजारो लोक जखमी झाले आहेत. दर तासाला मृतांचा आकडा वाढत आहे. या आपत्तीत अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे; तर काही लोकांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. भूकंपाच्या विध्वंसाशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाईट वाटेल. व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला तेथील परिस्थिती अन् एकंदरीत लोकांची अवस्था किती वाईट आहे याची कल्पना येईल.
अवघ्या पाच दिवसांच्या मुलासह १४ जण बेपत्ता
अफगाणिस्तानातील भूकंपाशी संबंधित एक काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रडताना दिसत आहे. भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या आपल्या घराच्या ढिगाऱ्यावर तो माणूस उभा आहे आणि आपले संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे तो सांगत आहे. अफगाणिस्तानातील हेरातमध्ये ही व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहत होती. मात्र, भूकंपामुळे त्याचे संपूर्ण घर, कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रडत असलेला तो माणूस एकटाच त्याच्या कुटुंबामध्ये बचावला आहे; बाकी त्याचे संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. यावेळी तो हतबल होऊन आपल्या कुटुंबीयांना हाक मारत आहे, ओरडत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पोटासाठी करावं लागतं! विक्रेता चालत्या ट्रेनमध्ये चढताना घसरला अन्…अंगावर काटा आणणारा Video होतोय व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार ही व्यक्ती त्याच्या १४ लोकांच्या कुटुंबासह या ठिकाणी राहत होती. भूकंपामुळे त्याचे संपूर्ण घर कोसळले आणि त्यात उपस्थित कुटुंबातील सर्व सदस्य ढिगाऱ्याखाली गाडले गेले. कुटुंबातील १४ सदस्यांपैकी एकाचाही शोध अद्याप लागलेला नाही. त्यांमध्ये अवघ्या पाच दिवसांच्या मुलाचाही समावेश आहे; जो ढिगाऱ्याखाली दबला गेला आहे. या आपत्तीत त्या व्यक्तीने आपले संपूर्ण कुटुंब गमावले आहे.